शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान फेब्रुवारीत मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:32 IST

येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा केले जाणार आहे.  

ठळक मुद्देप्रति क्विंटल २०० रुपये : ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले ६ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पणन संचालक कार्यालयास सादर

पुणे : कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्यासाठी बाजार समित्यांमार्फत २५ जानेवारीपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज स्वीकारण्यात आले. पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ ८ ते ९ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा केले जाणार आहे.      राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व काही खासगी बाजार समितीमध्ये १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांद्यांची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी येत्या १५ जानेवारीपर्यंत बाजार समित्यांमध्ये अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र,आवश्यक कागदपत्र जमा करण्यास वेळ लागत असल्याने पणन संचालक कार्यालयातर्फे २५ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली. १५ जानेवारीपर्यंत सुमारे सव्वालाख शेतक-यांचे अर्ज प्राप्त झाले होते. पुढील दोन ते तीन दिवसात २५ जानेवारीपर्यंत किती शेतक-यांनी अर्ज केले आहेत,याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अनुदान अर्जासाठी स्वंतत्र कक्ष सुरू करण्यात आहेत.शासनातर्फे शेतकºयांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान दिले जाणार आहे.      पुणे जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) अनंत कटके म्हणाले,पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक शेतक-यांनी या कालावधीत कांदा विक्री केली.काही शेतक-यांकडे कांदा विक्रीच्या दोन हे तीन पट्ट्या होत्या.मात्र,प्रत्येक शेक-याकडून केवळ एकच अर्ज स्वीकारला गेला.त्यातच कोल्हापूर, अहमदनगर, सातारा यांसह इतर जिल्हांमधील शेतक-यांनी सुध्दा पुण्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केली. मात्र,अनेक शेतक-यांनी अनुदानासाठी अर्ज केले नाहीत.शेतक-यांकडून अजूनही अर्ज स्वीकारले जात असून अर्ज स्वीककृतीसाठी शासनाकडून मुदत वाढून घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.परंतु, २५जानेवारीपर्यंत पुण्यात अर्ज केलेल्या 8 ते 9 हजार शेतक-यांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे.त्यासाठी ६ कोटी रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पणन संचालक कार्यालयास सादर केला आहे.----------------------शेतक-यांना २५ जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. पुढील दोन दिवसात राज्यातील एकूण किती शेतक-यांनी अनुदानासाठी अर्ज केले आहे,याबाबतची माहिती प्राप्त होईल. अर्ज केलेल्या शेतक-यांना पहिल्या टप्प्यात अनुदानाची रक्कम दिली जाईल.- दिपक तावरे,पणन संचालक  

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीGovernmentसरकार