शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेततळयांचे गाव घाटा

By admin | Updated: January 18, 2017 09:00 IST

केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या घाटा गावात ४५ शेततकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी सेवा योजनेंतर्गंत शेततळयाचा लाभ घेतला.

नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. १८ -  वाशिम येथून जवळच असलेल्या दळणवळणाचा योग्य रस्ता नसलेल्या व केवळ ६०० लोकसंख्या असलेल्या घाटा गावात ४५ शेततकऱ्यांनी शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी सेवा योजनेंतर्गंत शेततळयाचा लाभ घेतला. शेततळ्याचा एवढा मोठा लाभ घेणारे जिल्हयातील हे एकमेव गाव ठरले आहे. येथील शेतकऱ्यांच्या पुढाकाराने इतरही गावातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. आज येथील शेतकरी या शेततळयाच्या आधारावर विविध प्रकारची पीके घेऊन स्वावलंबी झाला आहे.या कामासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यासाठी जिल्हा कृषी अधिकारी के.एस. गावधाने , उपविभागीय कृषी अधिकारी मुरली इंगळे, कृषी सहायक डी.के. रणवीर, बँक शाखा व्यवस्थापक बी.एस. जाधव, निरिक्षक के. एस. गायकवाड यांनी परिश्रम घेवून पाठपुरावा करुन मोलाचे मार्गदर्शन केले. या शेततळयांचय आधारावर शेतकऱ्यांनी मिरची, टमाटे व काकडी अशी लागवड केली. यामधून शेतकऱ्यांना मोठा आर्थीक फायदा होत आहे. शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून बरेच शेतकरी शेततळे घेण्यासाठी उत्सूक आहेत. घोटा गावामध्ये शेडनेटचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये ७ शेतकरी अल्पभुधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे हे विशेष!मागेल त्याला शेततळे योजनेचा फायदामागेल त्याला शेततळे योजनेचा घोटा या गावाने पुरेपुर फायदा केल्याने आज येथे शेतकऱ्यांच सिंचनाचा प्रश्न मिटत आहे. काही शेतकऱ्यांनी तर मिरचीचे उत्पादन घेणे सुरु केले आहे यामधून दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न घेणे सुरु केले आहे. योग्य नियोजन व कृषी विभागाचे सहकार्य तसेच बँकेने केलेल्या सहकायार्मुळे धोटा येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेचा फायदा घेतला आहे. येथील शेतकऱ्यांचे कार्य पाहता इतरही शेतकरी या योजनेच्या फायदयासाठी सरसावला आहे.आकारानुसार शेततळयासाठी खर्चघोटा गावात १४ बाय १४ चे ६, २४ बाय २४ चे ३०, ३४ बाय ३४ चे आठ व ४४ बाय ४४ चा एक असे एकूण ४५ शेततळे घेण्यात आले आहेत. या सर्व शेततळयांना प्लास्टिक अस्तरिकरण करण्यात आल्याने १४ बाय १४ शेततळयातून ५० हेक्टर सिंचन होणार आहे तर २४ बाय २४ च्या शेततळयांमधून २ हेक्टर, ३४ बाय ३४ च्या शेततळयातून ५ हेक्टर व ४४ बाय ४४ च्या शेततळयातून १० हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हे काम तीन टप्प्यात काम करण्यात येत असून प्रथम खोदकाम नंतर प्लास्टिक अस्तरिकरण व शेवटी तार फेन्सिंग .

आकारानुसार शेततळयातून होणारे सिंचन घोटा गावात १४ बाय १४ चे ६, २४ बाय २४ चे ३०, ३४ बाय ३४ चे आठ व ४४ बाय ४४ चा एक असे एकूण ४५ शेततळे घेण्यात आले आहेत. या सर्व शेततळयांना प्लास्टिक अस्तरिकरण करण्यात आल्याने १४ बाय १४ शेततळयातून ५० हेक्टर सिंचन होणार आहे तर २४ बाय २४ च्या शेततळयांमधून २ हेक्टर, ३४ बाय ३४ च्या शेततळयातून ५ हेक्टर व ४४ बाय ४४ च्या शेततळयातून १० हेक्टर सिंचनाची व्यवस्था होणार आहे. हे काम तीन टप्प्यात काम करण्यात येत असून प्रथम खोदकाम नंतर प्लास्टिक अस्तरिकरण व शेवटी तार फेन्सिंग .

कृषी विभागाच्या योजनेबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केल्याने व शेतकऱ्यांच्या पुढाकाराने व इच्छेने हे शक्य झाले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्य करण्यात आले. लाभार्थी शेतकऱ्यांच्या कायार्मुळे इतर शेतकरी आता पुढे येत आहेत.- डी.के. रणवीर कृषी सहायक, घोटा