शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मोर्चा आझाद मैदानात दाखल, मध्यरात्रीपासून पायपीट करत गाठले आझाद मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 07:15 IST

विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे पाचच्या सुमारास आझाद मैदान गाठले.

मुंबई - विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे पाचच्या सुमारास आझाद मैदान गाठले.   दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरु आहेत. मोर्चामुळं विद्यार्थांना त्रास होऊ नये म्हणून रात्रीच मोर्चेकरी आझाद मैदानाकडे जाण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान सभेने घेतला होता. त्यानुसार हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल झालेले शेतकरी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले.  आझाद मैदानाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाकडून बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र बहुतांश मोर्चेकरी पायीच आझाद मैदानाकडे निघाले. अखेर रात्री तीन ते चार तास पायपीट करत या शेतकरी आंदोलकांनी आझाद मैदान गाठले.  

2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, यासहीत अन्य मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीने नाशिकहून हजारे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केलेला लाँग मार्च रविवारी मुंबईत धडकला होता. हजारो शेतकऱ्यांच्या सहभागामुळे लक्षवेधी ठरलेल्या या मोर्चाला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता. तर हा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यावर सत्ताधारी भाजपाच्यावतीने मंत्री गिरीश महाजन हे मोर्चेकऱ्यांना भेटले होते. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक असून उद्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करणार आहे. त्यावेळी विविध खात्यांचे पदाधिकारी चर्चेत उपस्थित राहतील असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते.  विधान भवनाला घेराव नाशिकमधून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेल्या  शेतक-यांच्या मोर्चाने 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. हा मोर्चा आता सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई