शेतकरी संपाला सरकारकडून बगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 05:01 IST2019-09-02T05:01:07+5:302019-09-02T05:01:26+5:30
भाजप सरकारच्या काळात स्वामिनाथन आयोग, संपूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव आणि पेन्शन या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून १ जुलै २०१७ रोजी संप पुकारला़

शेतकरी संपाला सरकारकडून बगल
अण्णासाहेब नवथर
अहमदनगर : भाजप सरकारच्या काळात स्वामिनाथन आयोग, संपूर्ण कर्जमाफी, दीडपट हमीभाव आणि पेन्शन या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून १ जुलै २०१७ रोजी संप पुकारला़ शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाची नाकाबंदी केली. मात्र सरकारने सोयिस्कररित्या परिस्थिती हाताळत आंदोलनातील मागण्यांना एकप्रकारे बगल दिली़ आता त्याच प्रश्नांवर राजकारण सुरू आहे़
काय होत्या मागण्या?
च्स्वामिनाथन आयोग
च्शेतीमालाला दीडपट हमीभाव
च्संपूर्ण कर्जमाफी
च्शेतकºयांना पेन्शन
सरकारने काय दिले?
सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्जमाफीची घोषणा केली़ राज्यातील ४० हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला़ मात्र त्यातील जाचक अटीमुळे अनेक शेतकºयांना योजनेचा लाभ मिळाला नाही़ सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय जाहीर केला़ पण, त्यात सुसूत्रता नाही़ स्वामिनाथन आयोग केंद्राशी संबंधित असल्याने तो राज्याला लागू करता येत नाही, असे कारण पुढे करून हा आयोग पाच वर्षात लागू झाला नाही़ शेतकºयांना पेन्शन योजना लागू करण्याचे सरकार नावही घेत नाही़