शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
2
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
3
एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
4
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
5
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
6
भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
7
"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
9
Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
10
अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
11
"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
12
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
13
महिला वाढल्या, कंपन्यांच्या चुका अन् खर्चही कमी झाला; 5000 कंपन्यांच्या डेटातून खुलासा
14
"मुलाला माझं नाव ठाऊक नव्हतं, पण त्याने सूरजमुळे मला ओळखलं...", रितेश देशमुखने सांगितला खास किस्सा
15
Gold Silver Rate Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, मात्र चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पटापट चेक लेटेस्ट रेट
16
मुस्लिमबहुल प्रभागांत कोण 'धुरंधर'! एआयएमआयएमने काँग्रेससमोर उभे केले कडवे आव्हान
17
सावधान! ChatGPT आणि Geminiला चुकूनही विचारू नका 'या' गोष्टी; बसू शकतो मोठा फटका!
18
SIP Calculator: दर महिन्याला ₹५,००० जमा केले तर २० वर्षांमध्ये किती फंड तयार होईल; पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
VIDEO: दिल्लीच्या मशिदीजवळ रात्रभर बुलडोझरची कारवाई; बेकायदेशीर बांधकामं पाडली, दगफेकीचाही प्रकार
20
"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 22:26 IST

तुम्हाला विकास करायचा असेल तर गावखेड्यातील पाणंद रस्ते तयार करा. बाजारपेठेपर्यंत जाणारे रस्ते त्यावरील खड्डे बुजवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

हिंगोली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. हिंगोली वसमत येथे या शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला. याबाबत शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या रक्ताने पत्र लिहून हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या शेतकऱ्यांनी आम्हाला न्याय द्या नाहीतर इच्छामरण द्या अशी मागणी सरकारकडे केली आहे.

याबाबत शेतकरी म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाबाबत सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील मार्ग बदलण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. बाकी जिल्ह्यात तो मार्ग जुन्या आराखड्याप्रमाणेच जाणार आहे. गेल्या पावणे दोन वर्षापासून आम्ही विविध आंदोलन, निवेदने, मोर्चे काढले आहेत. मात्र हिंगोली, कळंबमध्ये शेतकऱ्यांचा विरोध नाही असं सरकार म्हणते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे हे मुख्यमंत्र्‍यांनी पाहिले पाहिजे. हिंगोली जिल्ह्यात ऊसाचे, हळदीचे आणि केळीचे पिक घेतले जाते. कुठल्या शेतकऱ्यांना गोव्याला माल घेऊन जायचा आहे. तुम्हाला विकास करायचा असेल तर गावखेड्यातील पाणंद रस्ते तयार करा. बाजारपेठेपर्यंत जाणारे रस्ते त्यावरील खड्डे बुजवा. आमचा विकासाला विरोध नाही. परंतु शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात न लावता विकास करा अशी मागणी त्यांनी केली. 

तर आम्ही शिक्षित नाही, आम्ही २ वर्ष जिल्हाधिकारी असेल, प्रशासन असेल त्यांना निवेदन देतोय पण कुणाला काही फरक पडत नाही. पोलिसांना पाठवून त्रास दिला जातो. शाईने निवेदन देऊन सरकारला जाग येत नसेल तर शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने निवेदन द्यायचे ठरवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लॅबमध्ये जात रक्त काढून आणले आणि हे पत्र शासनाला लिहिले आहे अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

"भाजपात प्रवेश करतो, पण शक्तीपीठ महामार्ग रद्द करा"

दरम्यान, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या संतप्त शेतकऱ्यांनी भाजपाच्या विजयाची घोषणा दिली. आम्ही भाजपा कार्यकर्ते नाही. परंतु भाजपात गेल्यावर नेते भ्रष्टाचार मुक्त होतात तसे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आम्ही भाजपात प्रवेश करतो असा उद्विग्न प्रतिक्रिया आंदोलनकारी शेतकऱ्यांनी दिली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers protest dream project, write letter in blood, seek euthanasia.

Web Summary : Farmers in Hingoli protest CM Fadnavis's Shaktipeeth highway project. They submitted a letter written in blood, demanding justice or euthanasia. Farmers highlight discrepancies in route alignment and lack of government response, threatening to join BJP if the project is canceled.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गBJPभाजपाFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन