शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवं जगण्याचं बळ; सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, धक्कादायक वास्तव आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:32 IST

देशभरात २०२३ मध्ये १०,७८६ आत्महत्या शेतीशी संबंधित; ३ वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांनी घट, प्रभावी उपाययाेजनांची आवश्यकता

मुंबई : बेभरवशाची शेती आणि त्यातून डोईवर वाढणारे कर्ज या विळख्यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून  पुन्हा एकदा समोर आले आहे. २०२३ मध्ये देशातील सरासरी प्रत्येक २ पैकी १ शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाली आहे. देशभरात २०२३ मध्ये एकूण १०,७८६ शेतीशी संबंधित आत्महत्या झाल्या असून ४,६९० आत्महत्या शेतकरी, तर ६,०९६ आत्महत्या शेतमजुरांनी केल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ६,६६९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली असून, ४,१५० शेतकरी आणि २,५१९ शेतमजूर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

देशात २०२३ मध्ये एकूण १,७१,४१८ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण ६.३ टक्के आहे. या ४,६९० शेतकरी/शेतमजुरांच्या आत्महत्यांपैकी ४,५५३ पुरुष आणि १३७ महिला आहेत. २०२१ मध्ये १०,८८१, तर २०२२ मध्ये ११,२९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०२१ मध्ये एकूण आत्महत्यांच्या तुलनेत हे प्रमाण ६.६ टक्के, तर २०२२ मध्येही ६.६ टक्के इतकेच राहिले आहे. याचाच अर्थ गेल्या ३ वर्षांत शेतकरी आत्महत्यांमध्ये केवळ ०.३ टक्क्यांनी घट झाली आहे. 

महिला शेतकऱ्यांनीही संपविले जीवन भारतात शेतकरी आत्महत्यांत ९७% पुरुष, ३% महिला आहेत. महाराष्ट्रातही हेच प्रमाण दिसते. अहवालानुसार, महाराष्ट्रात २०२३ मध्ये ३,९०१ पुरुष तर २५० महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. २,४४१ पुरुष आणि ७७ महिला शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५ टक्क्यांच्या आसपास आहे.  

देशात सर्वाधिक आत्महत्या कुणाच्या? रोजंदारी कामगार     २७.५% गृहिणी     १४.०% स्वयंरोजगार     ११.८% पगारी कर्मचारी     ९.६% बेरोजगार     ८.३% विद्यार्थी     ८.१% शेती क्षेत्र     ६.३% निवृत्त व्यक्ती     ०.६% इतर     १३.७% 

कोणत्या राज्यांत शेतकरी आत्महत्या नाहीत? : पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप.

देशभरात आत्महत्या का केल्या जात आहेत? कौटुंबिक समस्या     ३१.९% आजारपण     १९.०% व्यसन/दारूचे व्यसन     ७.०% विवाहाशी संबंधित समस्या     ५.३% प्रेमसंबंध     ४.७% दिवाळखोरी/कर्जबाजारीपणा     ३.८% बेरोजगारी     १.८% परीक्षेत अपयश     १.४% नातेवाइकांचा मृत्यू     १.३% व्यावसायिक/करिअर समस्या     १.१% मालमत्तेचा वाद     १.०% गरिबी     ०.७% सामाजिक प्रतिष्ठा गमावणे     ०.५% अवैध संबंध     ०.४% वंध्यत्व/अपत्य न होणे     ०.३% कारण माहीत नाही     १०.०% इतर कारणे     ९.८%

व्यावसायिकांच्या आत्महत्या सर्वाधिक कुठे?महाराष्ट्र     १६%कर्नाटक     १४.१%तामिळनाडू     ८.९%प. बंगाल     ८%मध्य प्रदेश     ६.८%

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Need Strength to Live; Maharashtra Has Highest Suicides

Web Summary : Maharashtra leads in farmer suicides, with nearly half of India's cases occurring there in 2023. NCRB data reveals 6,669 farmer suicides in Maharashtra, including 4,150 farmers and 2,519 farm laborers. Family problems, illness, and addiction are major contributing factors to suicides nationwide.
टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्र