शेतकरी आत्महत्याग्रस्त १३९ कुटुंबांना मदत
By Admin | Updated: May 10, 2014 19:00 IST2014-05-10T19:00:11+5:302014-05-10T19:00:11+5:30
नापिकी व कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात आतापर्यंत ३३८ शेतकर्यांनी मृत्यूस कवटाळले आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त १३९ कुटुंबांना मदत
धुळे : नापिकी व कर्जबाजारीपणातून जिल्ह्यात आतापर्यंत ३३८ शेतकर्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. त्यापैकी १३९ शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबे शासनाच्या मदतीस पात्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुका स्तरावर सध्या अशा मदतीसाठीचे १७ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. तपासणीनंतर ते जिल्हा स्तरीय समितीला प्राप्त झाल्यानंतर बैठक बोलावून त्यावर विचार करण्यात येणार आहे. २००१ ते २००३ या तीन वर्षांच्या कालावधीत एकही शेतकरी आत्महत्या झालेली नव्हती. परंतु २००४ पासून त्या होऊ लागल्या. शेतकर्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाची परवड होऊ नये यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येते. आतापर्यंत जिल्हास्तरीय समितीला प्राप्त ३२१ प्रस्तावांपैकी १३९ मदतीसाठी पात्र तर तब्बल १८२ प्रस्ताव अपात्र ठरले. चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत १२ शेतकरी आत्महत्या झाल्या. याच कालावधीत गारपिटीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले.