शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

'शेतकऱ्यांनो, निश्चिंत रहा...', मोदी सरकारच्या कृषी कायद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

By ravalnath.patil | Published: October 11, 2020 4:36 PM

Uddhav Thackeray : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत जी काही पिकं येतील ती येऊ द्या, निश्चिंत रहा, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले.

मुंबई : जे चांगलं आहे, त्याचा आम्ही नक्कीच स्वीकार करू. पण, शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडणार असेल, तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही. असे सांगत मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत जी काही पिकं येतील ती येऊ द्या, निश्चिंत रहा, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी केंद्र सरकारने जे कृषी धोरण मंजूर केलेले आहे. त्याचे फायदे किंवा त्याचे फटके आपल्याला काय बसतील? त्याबद्दल देखील विचार सुरू आहे. आपल्या हिताचं काय? शेतकऱ्यांच्या हिताचं काय? हे पाहिलं जात आहे. माझं असंही म्हणणं नाही की सगळचं काही बरोबर किंवा चुकीचं आहे. जे बरोबर असेल त्याचा जरूर आम्ही स्वीकार करू. पण जर अयोग्य असेल व जर कुठं शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पडणार असेल, तर मात्र आम्ही ते स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

आपल्या राज्याचं धोरण आहे. आम्ही जे करू ते जनतेच्या हिताचं करू, शेतकऱ्यांच्या हिताचं करू. उगाचच काहीतरी कायदा आला आहे, म्हणून तो जसाच्या तसा नाही. चांगला असेल तर आनंदच आहे. पण जर का तसा नसेल तर मात्र या सर्व शेतकरी संघटनांशी आम्ही बोलतो आहोत. त्यांच्याकडून विविध सूचना येत आहेत. काही आक्षेप आहेत. काही गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे, यावर देखील विचार केला जात आहे. त्या सर्वांशी बोलून मग आपण या कृषी कायद्याबद्दल बोलूयात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याचबरोबर, राज्यात निसर्ग च्रकीवादळ कोकणात येऊन गेली. पूर्व विदर्भात पूरपरिस्थिती गंभीर होती. या ठिकाणी आवश्यक ते सर्व काम आपण करत आहोत. पंचनामे जवळपास झाले आहेत. निसर्ग चक्रीवादाळाची मदत आपण बऱ्यापैकी दिली आहे. पूरपरिस्थितीबद्दलही सांगली, कोल्हापूर प्रमाणे आपण नुकसानभरपाई देत आहोत. तरी देखील त्याच्यानंतर सततच्या पावसामुळेही अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जी काही पिकं येतील ती येऊ द्या, शेतकऱ्यांनो निश्चित राहा, तुम्हाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. सर्व पिकांबाबत आपण खबरदारी घेत आहोत. सर्व ठिकाणी पंचनामे सुरू असून यथोयोग्य जी काही नुकसान भरपाई आहे. आपण ती देत जात आहोत. असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सांगितले.

हमखास भाव मिळेल ते पिकवण्यासाठी आग्रह 'जे विकेल ते पिकेल' हे एक आपलं कृषीचं धोरण आहे. याबाबत आता आपण जनजागृती करत आहोत. ज्याला हमखास भाव मिळेल ते पिकवण्यासाठी सरकारचा आग्रह आहे. अनेक शेतकरी यामध्ये सहभागी होत आहेत. या सरकारची सुरुवातच आपण जवळपास साडेएकोणतीस लाख शेतकऱ्यांचं पीक कर्ज मुक्त करण्यापासून केली होती. मात्र तरी देखील हे चक्र सुरूच राहतं. यासाठी मग पीक आल्यानंतर ते साठवायचं कुठं? म्हणून आपण नाशिक परिसरात महाऑनिअन हा प्रकल्प सुरू केला. ही एक सुरूवात आहे. कांद्याप्रमाणेच सोयाबीन, कापूस यासाठी देखील आवश्यकतेनुसार साठवणुकीची व्यवस्था केली जाईल. ज्या ठिकाणी शीतगृहांची आवश्यकता आहे, तिथे ती व्यवस्था केली जाईल. साठवणुकीची आवश्यकता आहे तिथं गोदामं उपलब्ध केली जातील. यानंतर मग चागंली बाजारपेठ व शेतमाल यांची शेतकऱ्यांना सांगड घालून दिली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीagricultureशेती