शेतकरी संप : सोलापुरात भाजीपाल्याची आवक मंदावली, दरही कडाडले

By admin | Published: June 2, 2017 02:14 PM2017-06-02T14:14:31+5:302017-06-02T14:36:04+5:30

-

Farmer's Contact: Vegetable fluctuations in Solapur, prices have risen | शेतकरी संप : सोलापुरात भाजीपाल्याची आवक मंदावली, दरही कडाडले

शेतकरी संप : सोलापुरात भाजीपाल्याची आवक मंदावली, दरही कडाडले

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर, दि. 2 : कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कालपासून संपाची हाक दिली आहे. सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळं हा संप दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनामुळे बाजार समितीत येणारी आवक मंदावली असून भाज्या, दुधाचे भाव कडाडले आहे़ कुठे रस्त्यांवर दुध ओतून तर कुठे मोर्चा, रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे़ काही ठिकाणी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळ्यास जोडो मारो आंदोलनही करण्यात आले.


सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संपाचा दुसऱ्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी़
- वाखरी (तालुका पंढरपूर) मुख्यमंत्र्याच्या पुतळयास दुधाचा अभिषेक , आणि जोडो मार आंदोलन
- करमाळ्याचा आठवडी बाजार बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोळा जण पोलिसांच्या ताब्यात.
- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई.
- लऊळ मधील शेतकरी संपात सामील ;रस्यावर दुध ओतुन सरकार चा केला निषेध.
- गावातील पाले भाज्या बरोबरच तब्बल वीस हजार दुध लिटर दुध गावातुन पाठविणे केले बंद.
- सांगोला तहसिल कार्यालयावर किसान आमीर्चा शेतक-यासह मोर्चा, शेतकरी संपामुळे सलग दुस-या दिवशी सर्वच दुध संस्थांनी दुध संकलन केले नाही,
- पुणे - सोलापूर महामार्गावर भाजी फेकून देऊन शेतकरी संपात सहभागी
- मोहोळ येथे दूध सांडले,शेतकरी आक्रमक
- मंद्रुप येथे शेतकरी संघटनेकडून घोषणाबाजी करून आठवडा बाजार बंद पाडण्याचा प्रयत्न पोलीसांच्या हस्तक्षेपामुळे एक तासानंतर बाजार पुन्हा सुरु
- पंढरपूरातील आजचे डाळिंब सौदे बंद. व्यापाऱ्यांनी दिला शेतकरी संपास पाठिंबा
- डाळिंबाची आजची पन्नास ते साठ लाखाची उलाढाल ठप्प, २०० मजुर करतात या सौद्यात काम, मजुरांवर देखिल शेतकरी संपामुळे गदा
- कुडूर्वाडी भाजी मंडई कडकडीत बंद
- शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार किसान क्रांन्ती आंदोलन कुडूर्वाडीचा इशारा.
- शेतकरी संप दुसरा दिवस, बाजार समितीमधील भाजीपाला आवक घटली, पंढरपुरात वाखरी गावात मुख्यमंत्र्यानाचा पुतळा जाळला
- रानमसले गावातील दुकानदार संघटनेचा धडाडीचा निर्णय दुकाने बंद करून केला शेतकरी संघटनेला पाठींबा
- अकलुज कृषि उपन्न बाजार समिती १०० टक्के आवक बंद
- शेतकरी संप दुसरा दिवस, पोलीस बंदोबस्त असुन देखिल पंढरपूर मार्केटमध्ये शुकशुकाट

Web Title: Farmer's Contact: Vegetable fluctuations in Solapur, prices have risen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.