कांदा निर्यातबंदी उठवल्याचे शेतकरी संघटनेकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 12:43 PM2020-03-03T12:43:42+5:302020-03-03T13:00:30+5:30

नवीन कांद्याची मोठ्या प्रम‍ाणात आवक होत असल्यामुळे सध्या कांद्याचे दर उतरणीला लागले होते.

Farmers Association welcomes onion export ban | कांदा निर्यातबंदी उठवल्याचे शेतकरी संघटनेकडून स्वागत

कांदा निर्यातबंदी उठवल्याचे शेतकरी संघटनेकडून स्वागत

Next

कांद्याचे दर कोसळत असताना केंद्र शासनाने निर्यातबंदी व निर्यात शुल्क हटविल्याबद्दल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी स्वागत केले आहे. कांद्याच्या तुडवड्यामुळे वाढलेले कांद्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातबंदी, ८५० डॉलर निर्यात शुल्क लावण्यात आले होते. साठ्यांवरिल मर्यादा २५ क्विंटल पर्यंत घटविण्यात आली होती. शेतकरी संघटनेने वारंवार केंद्र शासनानेकडे हे निर्बंध हटविण्यासाठी पाठपुरावा केला होता. १ मार्च रोजी चांदवड येथे कांदा परिषद घेऊन कांदा व्यापार निर्बंधमुक्त करण्याचे ठराव करण्यात आला. 

नवीन कांद्याची मोठ्या प्रम‍ाणात आवक होत असल्यामुळे सध्या कांद्याचे दर उतरणीला लागले होते. केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याच्या दराची घसरण थांबून २००० रुपये क्विंटल पर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे. कांदा साठवणूक मर्यादेबाबत अद्याप स्पष्ट आदेश नाहीत. साठवणुक मर्यादा हटवली तरच व्यापारी निर्यातीसाठी साठा करू शकतील. निर्यातबंदी व निर्यात शुल्क हटविल्याचे शेतकरी संघटना स्वागत करत आहे. परंतू कांदा निर्यात कायमस्वरुपी सुरू राहिली पाहिजे. 

पुन्हा दर वाढल्यास निर्यातबंदी लागू होण्याची टांगती तलवार निर्यातदार व व्यापारी व शेतकऱ्यांवर राहू नये. कांदा साठवणूक व वाहतूक क्षमतेच्या मर्यादा हटविण्याबाबत सर्व राज्य सरकारांना सुद्धा सुचना देणे अपेक्षित आहे. शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जागृतीचे हे फळ आहे. सर्व शेतीमालावरील नियंत्रणे कायमस्वरुपी हटवावीत यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीला जाऊन, शांततेच्या मार्गाने पंतप्रधानांना साकडे घालणार असल्याचे अनिल घनवट यांनी जाहीर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi: भाजपा खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक; देशाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, अन्यथा...; संजय राऊत यांचा खोचक टोला

Narendra Modi : ...म्हणून मार्क झुकेरबर्ग यांनी मोदींसाठी बदलला होता आपला प्रोफाईल फोटो

Narendra Modi: 'या' कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार सोशल मीडियाला रामराम, रविवारपासून सर्व अकाउंट्स बंद करण्याचा विचार

 

Web Title: Farmers Association welcomes onion export ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.