शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

'त्या' शेतकरी, शेतमजुरांना १० लाखांची मदत द्या; काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:59 IST

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: महाराष्ट्रात वीज पडून २०२२ मध्ये २३६ तर २०२३ मध्ये १८१ मृत्यू

Vijay Vadettiwar, Maharashtra Assembly Monsoon Session 2025: राज्यात सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले होते. या गोंधळात काँग्रेसचे नाना पटोले यांचे एका दिवसासाठी निलंबनदेखील करण्यात आले होते. त्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले. राज्यात वीज कोसळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. जेव्हा शेतकरी किंवा शेतमजुरांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. अशा कुटुंबांना फक्त चार लाख मदत दिली जाते आहे. पण ही मदत वाढवून १० लाखांची करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.

विरोधकांची मागणी

विधान सभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी वीज कोसळून शेतकरी किंवा शेतमजुरांच्या मृत्यू प्रकरणी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली. वाघाने हल्ला केल्यावर २५ लाख रुपयांची मदत केली जाते. वीज कोसळून मृत्यू झाल्यामुळे मात्र चार लाख मदत केली जाते. ही मदत पुरेशी नसल्याने या मदतीची रक्कम वाढवावी. महाराष्ट्रात वीज पडून वर्ष २०२२ मध्ये २३६ मृत्यू झाले आहेत तर वर्ष २०२३ मध्ये १८१ इतकी मनुष्यहानी झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वीज पडून मृत्यू झालेले शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबाला १० लाख इतकी मदत द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

मंत्र्यांनी दिले उत्तर

यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापनामध्ये आधी वीज कोसळून मृत्यू याचा समावेश नव्हता. पण आता त्याचा समावेश करण्यात आला आहे असे सांगितले. तसेच या प्रकरणी मदत निधी वाढवून देण्याबाबत आपल्या सूचनांचा विचार करू आणि याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रmonsoonमोसमी पाऊसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारFarmerशेतकरी