शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात; अर्थसंकल्पावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:41 IST

कोल्हापूर : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किमती आभाळात, शेतकरी ...

कोल्हापूर : राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे कर्जमुक्ती हवेत, सिंचन कर गाळात, कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात, खताच्या किमती आभाळात, शेतकरी फक्त शक्तिपीठच्या भूसंपादनात, सोयाबीन-तूर-कांदा-कापूस सडतोय शिवारात, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी मात्र शिवारातील तणकाटात तर राज्यकर्ते, अधिकारी, दलाल मात्र राजमहालात असे वर्णन करावे लागेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितले.अर्थसंकल्पात औद्योगिक धोरणामध्ये कृषी औद्योगिक धोरणाला महत्त्व देणे गरजेचे होते. महायुतीने विधानसभा निवडणुकीत जाहीर केलेले जाहीरनाम्यातील किमान हमीभावावर २० टक्के अनुदान , शेतकरी कर्जमाफी, खतांवरील राज्य सरकारचा जीएसटी कमी करणे, सोयाबीनला ६ हजार हमीभाव देणे, कृषी प्रक्रिया केंद्र उभारणी, पायाभूत सोयी सुविधा, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाकरिता अधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधा, यासारख्या कोणत्याच गोष्टींचा यामध्ये उल्लेख नाही.शेती व्यवसायाला बगल दिल्याने याचे दुरगामी परिणाम शेतकरी व शेतमजुरांना भोगावे लागणार आहे. सिंचन कर आकारणी स्थगिती दिले असल्याचे जलसंपदामंत्री सांगत होते, मात्र त्याबाबत कोणतेच वक्तव्य वित्तमंत्री यांच्याकडून करण्यात आलेले नाही. एकीकडे बड्या उद्योगपतींच्या अनेक मोठमोठ्या प्रकल्पाकरिता करामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत व शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Agriculture Schemeकृषी योजनाAjit Pawarअजित पवारRaju Shettyराजू शेट्टी