शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

दोन्ही सरकारची कर्जमाफी फसवी; संग्रामपूरच्या शेतकऱ्याने होर्डींग’उभारून केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 6:14 PM

Farmer Protest through Hording in Buldhana District दोन्ही सरकारने दिलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप त्यामध्ये केला.

संग्रामपूर :  राजकीय नेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने राज्यकर्त्यांवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. त्याचे उदाहरण संग्रामपूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील भिलखेड येथील अत्यल्प भूधारक शेतकरी दोन्ही कर्जमाफीतून वंचित असल्याने  आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे डिजिटल बोर्डावर शेतात फोटो लाऊन निषेध केला आहे. दोन्ही सरकारने दिलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप त्यामध्ये केला.सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते शेतकरी विरोधीच असल्याचा संदेश त्यातून दिला जात आहे. निळकंठ लिप्ते यांच्याकडे भिलखेड शिवारातील गट क्र. ३० मध्ये अडीच एकर शेती आहे. या एका हेक्टर शेतीवर सन २०११ साली ठिबक सिंचन संचाकरिता ४२ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याच वर्षात २८ हजार रुपये पीक कर्ज काढले.  सन २०११ पासून २०१५ पर्यंत ठिबक संचासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरले. मात्र नापिकीमुळे २०१५ ला हे कर्ज थकीत झाले. तसेच पूर्वी २८ हजाराच्या पीक कर्जावर शासनाच्या योजनेप्रमाणे दोन वेळा प्रत्येकी ३० हजाराचे पुनर्गठन केले. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्यासाठी २४ जून २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. निकष जाहीर झाले. त्यानुसार दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. याहून अधिकची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. शासनाच्या आवाहनानुसार अल्पभूधारक  शेतकऱ्याने कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज  केला. या शेतकऱ्यावर दोन्ही कर्जाची व्याजासह एकूण रक्कम १ लाख ४७ रूपये थकीत होती. शासनाच्या ग्रीन लिस्टमध्ये या शेतकऱ्याचे नाव आले. मात्र, केवळ ४७ हजार रुपयांचीच कर्जमाफी प्राप्त झाली. दीड लाखाच्या आत थकीत कर्ज असल्यावर सुद्धा तत्कालीन सरकारच्या कर्जमाफीचा लाभ पूर्णपणे या शेतकऱ्याला मिळाला नाही. कालांतराने सत्ता बदल होऊन महाविकास आघाडी सत्तेत विराजमान झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये हिवाळी अधिवेशनात महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफीची धोषणा केली. १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले. मात्र यावेळीही या शेतकऱ्याला पूर्णपणे लाभ मिळाला नाही. १ लाख रुपये कर्ज थकीत असताना त्या शेतकऱ्याला केवळ  २८ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यांच्याकडे व्याजासह ७८ हजार रुपये बँकेचे कर्ज थकीत आहे. दोन्हीही कर्जमाफी मध्ये शासनाच्या घोषणेप्रमाणे पात्र असतानासुद्धा या शेतकऱ्याला अर्धवट कर्जमाफी देऊन थट्टा करण्यात आली. त्यामुळे हतबल  झालेल्या शेतकऱ्याने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरFarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे