शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

इथेही फेकच! मनोरमा खेडकर महाडमध्ये 'इंदुबाई' नावाने लपलेल्या; पहाटे ३.३० वाजता छापा पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 14:55 IST

Manorama Khedkar Arrest News: शेतकऱ्यांना, पोलिसांना आणि मेट्रो कर्मचाऱ्यांना दमदाटी करतानाचे, वाद घालतानाचे मनोरमा मॅडमचे व्हिडीओ अख्ख्या देशभरात प्रसिद्ध झाले होते. यामुळे त्यांनी पोलिसांपासून आणि सजग लोकांपासून लपण्यासाठी पार कोकणातील महाड गाठले.

आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर व कुटुंबाला चमकोगिरी चांगलीच भारी पडली आहे. पोलीस, शेतकरी, पत्रकारांसह सर्वांना दमदाटी करत फिरणाऱ्या मनोरमा खेडकर यांना आज पुणे ग्रामीण पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून अटक केली आहे. या मनोरमा मॅडम पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पुणे सोडून तिकडे रायगडच्या महाडमध्ये लपून बसल्या होत्या. अखेर एवढी वर्षे रुबाब दाखवून सर्व कारवायांपासून वाचलेल्या मनोरमा मॅडम गजाआड झाल्या आहेत. 

शेतकऱ्यांना, पोलिसांना आणि मेट्रो कर्मचाऱ्यांना दमदाटी करतानाचे, वाद घालतानाचे मनोरमा मॅडमचे व्हिडीओ अख्ख्या देशभरात प्रसिद्ध झाले होते. यामुळे त्यांनी पोलिसांपासून आणि सजग लोकांपासून लपण्यासाठी पार कोकणातील महाड गाठले. तिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही याची खात्री करून त्यांनी आपले नावही बदलले. हॉटेलमध्ये राहताना त्यांनी आपले नाव इंदूबाई असल्याचे सांगितले होते. आता यासाठी त्यांनी काय टेक्निक वापरली होती हे अद्याप बाहेर आलेले नाही.

आयएएस अर्धवटच राहण्याची शक्यता असलेल्या मुलीने युपीएससी परीक्षा अनेकदा देण्यासाठी पत्ता खोटा, रेशन कार्ड बनावट बनवून घेतल्याचे समोर आले होते. याद्वारे तिने अपंगत्वाचे प्रमाणपत्रही मिळविले होते. त्यापूर्वी उत्पन्न खोटे दाखवून नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटही मिळविले होते. हे सर्व करून तिने आयएएस पद बळकावल्याचे तिच्यावर आरोप होत असताना आता तिच्या आईने लपण्यासाठी खोटे नाव वापरल्याचे समोर आले आहे. याबाबतची बातमी आजतकने दिली आहे. 

हिरकणी भागातील या हॉटेल मालकाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता पुणे पोलीस महिला कॉन्स्टेबलसोबत इथे आले होते. सकाळी साडे सहा वाजता निघून गेले. यावेळी मनोरमा यांनाही सोबत नेले. 

मनोरमा या सुरुवातीपासूनच पोलिसांना सहकार्य करत नव्हत्या. ऑडी कारची नोटीस द्यायला गेलेल्या पोलिसांनाही तिने हाकलले होते. पिस्तुलने दमदाटी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच मॅडमवर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर मॅडम गायब झाल्या होत्या. पोलीस त्यांना बाणेरच्या घरी शोधूनही आले होते. मनोरमा मॅडमनी फोनही बंद ठेवला होता. मनोरमा आणि त्यांचा पती दिलीप चौकशीला सहकार्य करत नव्हते. यामुळे पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविल्याचे सांगण्यात आले. 

आता पर्यंत खेडकरांचे काय काय प्रकार समोर आले? खरेतर मुळशीपासून खेडकरांचे अहमदनगरला असलेले गाव हे सुमारे २५० किमी दूर आहे. पोलिसांनी खेडकर दाम्पत्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पिस्तूलचे लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे द्या नोटीस बजावण्यात आली आहे. हे लायसन रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी खोटी, बनावट कागदपत्रे देऊन आयएएस नोकरी हडपलेली आहे. एसीबीने दिलीप खेडकर यांच्या करोडोंच्या संपत्तीची चौकशी सुरु केली आहे. यात आता आयकर विभागानेही लक्ष घातले असून ते देखील चौकशी करणार आहेत. पूजा खेडकर यांच्यावर प्रशिक्षण रद्दची कारवाई करण्यात आली आहे. या आठवडाभरात त्यांना मसुरीला हजर राहण्याचे बजावण्यात आले आहे. यातच मनोरमा यांचा पोलिसांशी मेट्रोच्या कामावरून हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेने मनोरमा यांच्या बाणेरच्या बंगल्याच्या समोरील फुटपाथवरील अतिक्रमण तोडले आहे. 

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरPuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी