शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

आर्थिक ताळेबंद पाहूनच जुन्या पेन्शन योजनेवर घेणार निर्णय - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 06:20 IST

योजना लागू केल्यास तिजोरीवर मोठा भार पडून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार नकारात्मक नाही. मात्र, योजना लागू केल्यास तिजोरीवर मोठा भार पडून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. यावर व्यवहार्य तोडगा काढावा लागणार आहे. जर कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना यांच्याकडे तसा तोडगा असेल तर अधिवेशनानंतर अशा मान्यताप्राप्त संघटना, वित्त आणि नियोजन विभागाच्या सचिवांसोबत बसून त्यांचे म्हणणे ऐकून आर्थिक ताळेबंद पाहून निर्णय घेऊ अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

राजेश राठोड यांनी याबाबत तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित केला. त्यास उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ही घोषणा आता केली तर आताच्या सरकारवर त्याचा दुष्परिणाम होणार नाही. मात्र, आणखी दहा वर्षांनी आर्थिक स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. 

वेतन, निवृत्तीवरचा खर्च ६२ टक्क्यांवरसध्या वेतन, निवृत्तीवेतन आणि व्याजप्रदानावरील राज्याचा खर्च ५८ टक्के आहे. यावर्षी तो ६२ टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी हा खर्च ६८ टक्क्यांवर जाईल. त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेचे परिणाम आता जाणवणार नाहीत. कारण २००५ दरम्यान सेवेत रुजू झालेले लोक २०२८ आणि २०३० नंतर निवृत्त होण्यास सुरुवात होणार आहे. २०२८ पासून २८ लाख कर्मचारी निवृत्त होतील. तेव्हा राज्याला या योजनांबाबत व्यवहार्य तोडगा काढणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.

अंगणवाडीसेविकांच्या मानधनात २०% वाढ केली जाईल. त्यांना नव्याने मोबाइल संच दिले जातील, त्यासाठी १५० कोटींची तरतूद केल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केली. मात्र, उत्तराने समाधान न झाल्याने विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला व पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.

आमदार कुणाल पाटील, अबू आझमी, यांच्यासह तब्बल १०० हून अधिक आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांनी सेविकांना किमान १५ हजार आणि मदतनिसांना १० हजार रुपयांचे मानधन देण्याची मागणी केली.

अंगणवाडीसेविकांच्या मानधनात २०% वाढअंगणवाडीसेविकांना आतापर्यंत ८,५०० रूपये मासिक मानधन होते. ते आता १० हजार रुपये आणि मदतनिसांना ४,५०० रूपये मानधन होते ते ५,५०० रूपये करण्यात येणार आहे.

एक तास विशेष चर्चा होणार   अधिवेशनात १५ मार्चच्या आत सकाळच्या सत्रात या विषयावर एक तास विशेष चर्चा करावी, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPensionनिवृत्ती वेतन