मुंबई : अल्पसंख्याक शाळा आणि आश्रमशाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना अन्य शाळेतील रिक्त पदांवर समायोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना समायोजनानूसार जी शाळा देण्यात येईल त्याठिकाणी रुजू होणे गरजेचे आहे. जर नियूक्ती देऊनही संबंधित शिक्षक रुजू होत नसेल, तरच त्यांना ‘नो वर्क नो पे’ या नव्या नियमानुसार वेतन दिले जाणार नाही. अतिरिक्त शिक्षक रुजू झाल्यास अशा कोणत्याही शिक्षकांचे वेतन थांबविण्यात येणार नसल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.अल्पसंख्याक शाळा आणि आश्रमशाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना अन्य शाळेत समायोजन होईपर्यंत ‘नो वर्क नो पे’ या शासन निर्णयानुसार वेतन बंद करण्याचे धोरण अन्यायकारक असून तो रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. त्यावेळी तावडे बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत कपिल पाटील, नागो गणार, दत्तात्रय सावंत आदी सदस्यांनी सहभाग नोंदविला.
अतिरिक्त शिक्षकांचे वेतन थांबणार नाही : तावडे
By admin | Updated: August 5, 2016 01:41 IST