२४ तासांत शेतातल्या फळभाज्या थेट ग्राहकांच्या घरी; प्रयोगशील शेतकऱ्यांनी उघडली 'ऑनलाईन मंडई'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 01:42 PM2020-07-29T13:42:53+5:302020-07-29T13:53:07+5:30

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांशी नातं जोडलं आहे.

Experimental farmers open 'online vegetable market' to sell customer directly | २४ तासांत शेतातल्या फळभाज्या थेट ग्राहकांच्या घरी; प्रयोगशील शेतकऱ्यांनी उघडली 'ऑनलाईन मंडई'

२४ तासांत शेतातल्या फळभाज्या थेट ग्राहकांच्या घरी; प्रयोगशील शेतकऱ्यांनी उघडली 'ऑनलाईन मंडई'

Next
ठळक मुद्देअहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' उपक्रम सुरु केलाशेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.   सर्वसामान्यांसह सेलेब्रिटीही करतायेत ऑनलाईन भाजीखरेदी

देशात सध्या कोरोनाचं संकट समोर आहे, अशातच गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे, या संघर्षाच्या काळात अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी एका अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतातील ताजी फळे, भाज्या पोहचवण्याचं काम हाती घेतलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसह अनेक सेलेब्रिटींनीही घरबसल्या भाजीपाला मागवला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांशी नातं जोडलं आहे. श्रीरामपूरमधील आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या शेतातून मुंबई- पुण्याच्या व अन्य शहरांतून जमलेल्या शेकडो ग्राहकांना भाजीपाला पोहचवण्याचं काम सुरु केले आहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' ह्या ऑनलाईन मंडईची स्थापना केली आहे.

लॉकडाऊन काळात अनेक फळभाजी पुरवठादार व विक्रेते, उद्यमशील व्यक्ती व नवउद्योगांनीही ऑनलाईन व घरपोच भाजीपाला व फळे विक्रीचा उद्योग सुरु केला आहे. घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या लोकांसाठी ही सोय असली तरीही याप्रकारच्या भाजीपाला व फळे पुरवठ्यात काही त्रुटी आहेत. यातील अनेकजण शेतकऱ्यांकडून घाऊक खरेदी करून, भाजीपाला व फळांचा साठा करून मागणीप्रमाणे पुरवठा करीत आहेत. यात ग्राहकांना आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असलेला ताजा, पोषणमूल्ये टिकून असलेला व स्वच्छ भाजीपाला मिळत नसल्याने ग्राहक वंचित राहिले आहेत. यादृष्टीने, ग्राहकांना ताजा शेतमाल कसा असतो व कमीतकमी वेळेत थेट शेतातून तो दारी कसा पोहोचू शकतो, हे या कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.                 

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' या 'शेतकरी उत्पादक कंपनी'ची अलिकडेच स्थापना केली असून कमीतकमी वेळेत ताजा शेतमाल घरपोच  पोहोचविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन असा प्रगतीशील व तंत्रज्ञानावर आधारित मंच उभा करण्याचा अहमदनगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नाला मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या शहरांतून शेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.         

या उपक्रमामध्ये अनेक तरूण, सुशिक्षित, प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी एकत्र आले असून, त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करीत भाजीपाला व फळांचे वितरण करण्याची व्यवस्था केली आहे. यात आधुनिक मशागत, पीक काढणी प्रक्रियेबरोबर मालाचे वर्गीकरण, बास्केट पॅकिंग व ग्राहक केंद्राच्या मदतीने विनाविलंब २४ तासात ग्राहकांच्या दारी भाजीपाला पोहोचविण्यासाठी शेतकरी भर देत आहेत. गेल्या तीन महिन्यांत 'किसान कनेक्ट'ने सुमारे ८० हजार फळभाज्यांच्या बास्केटस् मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी वितरित केल्या आहेत. फळभाज्या ताज्या, शुद्ध व स्वच्छ राहून त्यांची हाताळणी होऊ नये यासाठी प्रथमच 'किसान कनेक्ट' खास बनविलेल्या बास्केटसमधून ग्राहकांना पुरवठा करीत आहे.

Web Title: Experimental farmers open 'online vegetable market' to sell customer directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी