शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उद्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; कोणकोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 15:08 IST

भाजपा सरकारच्या काळात शिवसेनेला दुय्यम मंत्रीपदे देण्यात आली होती. तसेच जास्त नेत्यांना संधी मिळालेली नव्हती.

मुंबई : महाराष्ट्रात निवडणुकीचे निकाल लागून दोन महिने होत आले तरीही महाविकास आघाडीला मंत्रिमंडळाचा विस्तार करता आलेला नाही. सरकार स्थापनेवेळीही असा वेळकाढूपणा करण्यात आला होता. यावरून गेल्या काही दिवसांपासून टीकेचे धनी ठरलेल्या उद्धव ठाकरे सरकारला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून पहिल्या टप्प्यात 36 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

भाजपा सरकारच्या काळात शिवसेनेला दुय्यम मंत्रीपदे देण्यात आली होती. तसेच जास्त नेत्यांना संधी मिळालेली नव्हती. आता शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांचे सरकार आलेले असल्याने काही नेत्यांचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तर पाच वर्षांपूर्वी सत्तेतून बाहेर गेलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मंत्रिपदासाठी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे. आज काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार संभ्याव्य मंत्र्यांची यादी समजली आहे. 

शिवसेनेकडून अनिल परब, रविंद्र वायकर किंवा सुनील प्रभू, सुनील राऊत, उदय सामंत, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, शंभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर, संजय शिरसाट किंवा अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील, दादा भुसे किंवा सुहास कांदे या आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 

तर काँग्रेसकडून के. सी. पाडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, विश्वजित कदम, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल यांच्या नावावर थोड्याच वेळात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादीकडून कोण? राष्ट्रवादीकडून अजित पवार हे शपथ घेणार आहेत. यानंतर दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे, अदिती तटकरे, डॉ. किरण लहामटे यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस