शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive! पोलीस अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले; गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 11:48 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट, लोकमत ऑनलाइनच्या कार्यक्रमात विशेष मुलाखत

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाºयांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकमत आॅनलाइनच्या ‘ग्राउंड झीरो’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले. ही संपूर्ण मुलाखत ‘लोकमत यूट्युबवर’ आहे. सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाºयांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहºयावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाºयांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाºयाचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले.

पवार यांनी एका महिला अधिकाºयाचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या, असे सांगत अन्य चार अधिकाºयांची नावेही सांगितली होती, असेही एका नेत्याने स्पष्ट केले. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला. नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाºयांच्या बदल्यांमध्ये त्यातील काही अधिकाºयांना बाजूला सारले गेले. तर काही अधिकाºयांना आजही महत्त्वाची पदे दिली आहेत. वास्तविक अशा अधिकाºयांना पूर्णपणे बाजूला ठेवायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे.

कडक लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमिताभ गुप्ता या पोलीस अधिकाºयांनी येस बँक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांना महाबळेश्वरला जाण्यासाठी संमतीपत्र दिले. त्यामुळे सरकार अडचणीत आले. त्यांना आता पुण्याचे आयुक्त केले आहे. याचे समर्थन कसे कराल, असे विचारले असता गृहमंत्री म्हणाले, गुप्ता यांच्या हातून त्या काळात शंभर टक्के चूक झाली. ती मोठी चूक होती. त्यांनी चौकशी समितीसमोर जाहीर कबुलीदेखील दिली. पण त्यांची आजपर्यंतची कारकिर्द चांगली राहिली आहे. म्हणूनच त्यांना आता पुण्याची जबाबदारी देण्यात दिली.छोट्या - छोट्या कारणांसाठी राज्यपालांकडे जाण्याचे काम विरोधी पक्षाकडून होत आहे. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. पण त्यांनी आता राजभवनावर एक रूम घेऊन राहावे. म्हणजे जाण्या-येण्याचा त्रास होणार नाही, असेही गृहमंत्री देशमुख म्हणाले. कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी यांच्याविषयी ते म्हणाले, मुंबईला पाकिस्तान म्हणायचे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणून संबोधायचे, अशा गोष्टी करणाºयांचे मी नावही घेऊ इच्छित नाही. या सगळ्या गोष्टींना भाजप खतपाणी घालत आहे.

संपूर्ण मुलाखत ‘लोकमत यूट्युब’वरपार्थ पवार यांनी सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी, असे पत्र जेव्हा पहिल्यांदा दिले त्या वेळी आपली प्रतिक्रिया काय होती? इथपासून ते पोलीस भरतीत मराठा आरक्षण, कोरेगाव-भीमा चौकशी समितीला मुदतवाढ, एल्गारच्या चौकशीसाठी वेगळी एसआयटी, पोलीस दलाचे आधुनिकीकरण अशा अनेक विषयांवर गृहमंत्र्यांनी उत्तरे दिली आहेत. ही संपूर्ण मुलाखत आज सकाळी 10.30 वाजता  ‘लोकमत यूट्युब’वर पाहता येईल. तसेच ही संपूर्ण मुलाखत आज सकाळी 10 वाजता खालील फेसबुक लिंकवर पाहता येईल. 

मग नेत्यांचा काय उपयोग? - खा. संजय राऊतगृहमंत्री देशमुख यांच्या विधानाविषयी खा. संजय राऊत म्हणाले की, अधिकारी जर सरकार पाडायचे काम करू लागले तर निवडून आलेल्या नेत्यांचा काय उपयोग? महाराष्ट्रातले सरकार एवढे लेचेपेचे नाही. काही अधिकाºयांविषयी पहिल्याच दिवशी शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत मते सांगितली होती. काहींना ताबडतोब बदलले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यातील किती बदल झाले, हे गृहमंत्रीच सांगू शकतील.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार