पुढील अधिवेशनात अध्यक्षांची निवड नक्की : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 05:41 IST2021-12-29T05:40:45+5:302021-12-29T05:41:14+5:30

Nana Patole : अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती परंतु शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविले.

Exact choice of president in next convention: Nana Patole | पुढील अधिवेशनात अध्यक्षांची निवड नक्की : नाना पटोले

पुढील अधिवेशनात अध्यक्षांची निवड नक्की : नाना पटोले

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने निवडणूक घेण्याचे टाळले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात ती नक्कीच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले की, नियमात बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी घटनात्मक पदाचा मान राखावा, राजकारण करू नये. विधानसभा अध्यक्षपदासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती. राज्यपालपदाचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सरकारने घेतली होती.

अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती परंतु शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविले. कायद्याचा पेच निर्माण होऊ नये म्हणून मविआ सरकारने अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात घेणे टाळले. ही निवडणूक फेब्रुवारीत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Exact choice of president in next convention: Nana Patole