वृक्ष लागवडीतून वसुंधरेचे ऋण प्रत्येकाने फेडावे - सुधीर मुनगंटीवार

By admin | Published: June 14, 2017 12:55 AM2017-06-14T00:55:06+5:302017-06-14T00:55:06+5:30

येत्या १ जुलै ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत ४ कोटी वृक्ष लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येकाने एक तरी झाड लावावे

Everybody should pay the earth loan from the cultivation of trees - Sudhir Mungantiwar | वृक्ष लागवडीतून वसुंधरेचे ऋण प्रत्येकाने फेडावे - सुधीर मुनगंटीवार

वृक्ष लागवडीतून वसुंधरेचे ऋण प्रत्येकाने फेडावे - सुधीर मुनगंटीवार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या १ जुलै ते ७ जुलै या वनमहोत्सवाच्या कालावधीत ४ कोटी वृक्ष लावण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि वसुंधरेचे ऋण फेडावे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अध्यात्मिक संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बदलत्या तापमानाला सामोरे जाताना ग्लोबल वॉर्मिंगसारख्या विषयाला प्रत्यक्षातून परत डिक्शनरीत पाठवायचे असेल तर वृक्ष लागवड महत्त्वाची आहे.त्याकरिता सर्वांनी या कामात सहभागी होत आपले योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: Everybody should pay the earth loan from the cultivation of trees - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.