शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

"स्वतंत्र लढलो तरी किमान ६ जागा जिंकू; तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहावी"

By कमलेश वानखेडे | Updated: March 1, 2024 14:52 IST

सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात घमासामान सुरू आहे असं त्यांनी सांगितले.

नागपूर : राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची तयारी झाली आहे. फक्त दोन जागा आवाक्याबाहेरील आहे. महाविकास आघाडीशी ताळमेळ जुळला नाही व आम्ही स्वतंत्र लढलो तरी किमान सहा जागा जिंकु, असा दावा करीत तुटलेल्या पक्षांनी आपली ताकद पाहून विचार करावा, असा चिमटा वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी घेतला.

ॲड. आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले, सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात घमासामान सुरू आहे. आधी त्यांची चर्चा होते व नंतर ते आम्हाला बोलावतात. या चर्चेत सध्या आम्ही उपरे आहेत, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यभर १० मार्चपर्यंत ४२ जागांवर वंचितच्या जाहीर सभा होतील. आमच्या सोबत किती लोक आहेत हे सभांमधूून दिसत आहे. आम्ही सभेसाठी जेवन, गाड्या देत नाही. आमच्या विचारांना समर्थन देणारे स्वत:हून येतात, असेही त्यांनी सांगितले.

भाजपकडून नेते खरेदीचा सपाटा- भाजपने पक्ष फोडणे व नेते विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. यावरून भाजप घाबरलेली दिसत आहे. भीतीपोटी ४०० पार ची आकडेवारी वांरवार सांगितली जात आहे. भाजप नेते विकत घेईल पण कार्तकर्ते व मतदार विकत घेता येणार नाही, असे सांगत हे दोन्ही घटक भाजपच्या विरोेधात असल्याचा दावा ॲड. आंबेडकर यांनी केला.

मी अकोल्यातूनच लढणार- आपण स्वत: अकोला येथूनच लढणार असे ॲड. आंबेडकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. महाविकास आघाडीशी युती झाली तर सोशल डेमोक्रसीच्या मुद्यावर भर देऊ. १५ उमेदवार ओबीसी व ३ उमेदवार अल्पसंख्यक समाजातील असावे, अशी अट घातली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतावर जीडीपीच्या ८३ टक्के कर्जवर्ल्ड बॅंकेने भारताला इशारा दिला आहे की, जीडीपीच्या ८३ टक्के कर्ज झाले आहे. निवडणूका होऊन नवे सरकार येईपर्यत ते ८७ टक्क्यांपर्यंत जाईल. २०१४ मध्ये जीडीपीच्या २४ टक्केच कर्ज होते. १० वर्षात ते ८७ टक्के झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या उंबरठअयावर आहे. भाजपने १० वर्षात अर्थव्यवस्था पोखरली, असल्याची टीका ॲड. आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर