राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च पद असलेल्या सरसंघचालक पदाबद्दल सध्या सरसंघचालक असलेल्या मोहन भागवत यांना प्रश्न विचारला गेला. त्यावेळी त्यांनी ब्राह्मण आहे म्हणून व्यक्ती सरसंघचालक होऊ शकत नाही. क्षत्रिय, वैश्य, शूद्र होऊ शकत नाही. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकते, असे स्पष्ट करत मोहन भागवत यांनी यासाठीची एकमेव अट सांगितली. सरसंघचालक भागवत यांनी भ्रष्टाचार आणि त्यांच्या निवृत्तीच्या प्रश्नावरही भाष्य केले.
मोहन भागवत म्हणाले, "सरसंघचालक कोण बनले पाहिजे? तर कोणताही ब्राह्मण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक बनू शकत नाही. कोणताही क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनू शकत नाही. जो हिंदू असेल, तोच बनेल."
"सरसंघचालक तो अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींमधील असेल, तरीही बनू शकतो. दुसरा कोणी असेल तरी बनू शकतो. हे बघून आमच्याकडे कार्यकर्ते नियुक्त केले जात नाहीत", असे भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली.
भ्रष्टाचाराबद्दल मोहन भागवत काय बोलले?
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करताना सरसंघचालक भागवत यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, "गुरुदक्षिणा गोळा करण्यात आली. ती पडून होती. ती जमा करायची होती. विभाग प्रचारक प्रवास करू आले. ते पैसे दुसऱ्या दिवशी जिल्हा केंद्रात जमा करायचे होते आणि रात्री छात्रावासात जेवणच नव्हते."
पुढे सांगताना ते म्हणाले, "मी बोललो की काय झाले? ते म्हणाले, 'धान्य संपले आहे.' विचारलं किती दिवसापासून? ते म्हणाले, 'तीन दिवसांपूर्वी.' बोललो तीन दिवसांपासून उपाशी आहात, दोन हजार रुपये इथे पडलेले आहेत. ते म्हणाले, 'नाही. ती तर गुरुदक्षिणा आहे.' ही आहे दानत. पोटात अन्न नाहीये, पण त्या पैशाला हात लावला नाही. हे संस्कार करण्याचे काम संघ करतो. हे वाढत जाईल, तेव्हाच भ्रष्टाचार नियंत्रणात आणणं शक्य होईल", असे स्पष्ट विचार सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.
सरसंघचालक पदावरून निवृत्ती कधी घेणार?
सरसंघचालक भागवत निवृत्तीच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले, "नियुक्ती होते, निवृत्ती कधीही होऊ शकते. पण, कामातून निवृत्ती आयुष्यभर होत नाही. मरेपर्यंत काम करणारे लोकही आहेत. जोपर्यंत शरीर चालेल, तोपर्यंत काम करतात. पण, कोणत्या तरी पदावर राहणे... सामान्यतः आपण असा विचार करतो की, ७५ वर्षांनंतर कोणत्याही पदाशिवाय काम करायला हवे. याला संघाची परवानगी मिळेल, तेव्हा होईल."
"जशी माझी गोष्ट आहे. माझे ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मी कार्यकर्त्यांना म्हणालो की, आता झाले आहे. ते म्हणाले तुम्हाला काय झाले आहे? तुम्ही फिरत तर आहात. आणखी काम करा. तर मग मी थांबलो आहे. मी इथे राहावे ही माझी इच्छा नाहीये. कार्यकर्त्यांची राहत नाही. मी इथे राहू नये हा पण पर्याय माझ्याजवळ नाही, तो संघाचा पर्याय आहे. त्यामुळे संघ ज्यावेळी सांगेन तेव्हा जबाबदारीतून निवृत्ती होईल, कामातून निवृत्ती होणार नाही. निवृत्तीची कोणतीही निश्चित पद्धत नाहीये. त्यामुळे शेवटपर्यंत निवृत्त होई देत नाही", असे उत्तर मोहन भागवत यांनी निवृत्तीच्या प्रश्नावर दिले.
Web Summary : Mohan Bhagwat stated that any Hindu, regardless of caste, including SC/ST, can become RSS chief. The only requirement is being Hindu. He also addressed corruption and his retirement, stating he'll work until his body allows, following the organization's direction.
Web Summary : मोहन भागवत ने कहा कि कोई भी हिंदू, जाति की परवाह किए बिना, जिसमें एससी/एसटी भी शामिल हैं, आरएसएस प्रमुख बन सकता है। एकमात्र आवश्यकता हिंदू होना है। उन्होंने भ्रष्टाचार और अपनी सेवानिवृत्ति पर भी बात की, कहा कि वे संगठन के निर्देशानुसार, जब तक उनका शरीर अनुमति देगा, तब तक काम करेंगे।