ज्योती वाघमारेंकडून कागदपत्रे घेतली तरीही खासदारकीचं कळू दिलं नाही; एकनाथ शिंदेंनी सांगितला सगळा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:22 IST2026-03-09T15:10:28+5:302026-03-09T15:22:01+5:30

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेचा उमेदवार जाहीर करत सगळ्यांनाच धक्का दिला. ज्योती वाघमारे यांच्यासाठी यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. नेमकं काय घडलं, याचाच किस्सा शिंदेंनी सांगितला. 

Even after taking documents from Jyoti Waghmare, she did not reveal her MP status; Eknath Shinde told the whole story | ज्योती वाघमारेंकडून कागदपत्रे घेतली तरीही खासदारकीचं कळू दिलं नाही; एकनाथ शिंदेंनी सांगितला सगळा किस्सा

ज्योती वाघमारेंकडून कागदपत्रे घेतली तरीही खासदारकीचं कळू दिलं नाही; एकनाथ शिंदेंनी सांगितला सगळा किस्सा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. शिंदेसेनेने ज्योती वाघमारे यांना थेट राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला. हे कळल्यानंतर ज्योती वाघमारे यांनाही सुखद धक्का बसला, कारण या निर्णयाबद्दल त्यांना कोणतीही कल्पना दिली गेली नव्हती. त्यांच्या उमेदवारीचा किस्सा एकनाथ शिंदे यांनी सांगितला. एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याबद्दल सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "समिती स्थापन करण्यासाठी तुमची कागदपत्रे हवी आहेत, असे सांगून आम्ही त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली होती. नंतर त्यांना सांगितले की, राज्यसभेसाठी आपण तुमचा अर्ज भरणार आहोत."

"सर्वसामान्य महिलांना आपण स्थान दिले. प्रत्येक कार्यकर्त्यावर आमचे लक्ष असते. माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही म्हणून मी येणार नव्हतो, पण लाडका भाऊ बहि‍णींच्या प्रेमापासून वंचित राहायला नको म्हणून मी आलो. मी आईची तगमग आणि बायकोची काटकसर बघितली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू केली. आता ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला खासदार केले", असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

ज्योती वाघमारे या शिंदेसेनेची बाजू मांडत आल्या आहेत. शिंदेसेनेवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला त्या उत्तर देताना दिसतात. ज्योती वाघमारे यांना शिंदेसेनेत येऊ फार वर्षे झाली नाहीत. इतर नेत्यांच्या तुलनेत त्या नवख्या असल्याने त्यांना राज्यसभेवर पाठवले जाईल, अशी कुठेही चर्चा नव्हती. पण, एकनाथ शिंदेंनी भाजपासारखेच धक्कातंत्र अवलंबलं आणि पक्षातील नेत्यांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

Web Title : शिंदे का सरप्राइज: कागजात लिए, वाघमारे को राज्यसभा सीट!

Web Summary : एकनाथ शिंदे ने खुलासा किया कि ज्योति वाघमारे का राज्यसभा नामांकन एक आश्चर्य था। कागजात बहाने से लिए गए। शिंदे ने सामान्य महिलाओं को अवसर देने और पार्टी कार्यकर्ताओं का समर्थन करने पर जोर दिया, वाघमारे की निष्ठा और अप्रत्याशित पदोन्नति को उजागर किया।

Web Title : Shinde's Surprise: Documents taken, Rajya Sabha seat for Waghmare!

Web Summary : Eknath Shinde revealed Jyoti Waghmare's Rajya Sabha nomination was a surprise. Documents were obtained under false pretenses. Shinde emphasized giving opportunities to ordinary women and supporting his party workers, highlighting Waghmare's loyalty and unexpected elevation.