शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 20:08 IST

पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़.

ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्हे पावसाच्या प्रतिक्षेतपावसाळा सुरु होऊन दीड महिन्यानंतरही २४ जिल्ह्यात पाऊस कमी

पुणे : पावसाळ्याचा दीड महिना उलटून गेला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्हे व नाशिक वगळता राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे़. मराठवाड्यात ३१ टक्के तर विदर्भात ३० टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे़. त्यामुळे या जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या असून जेथे शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांचे आता पावसासाठी आकाशाकडे डोळे लागले आहेत़. राज्यात सध्या केवळ कोकण, गोव्यात प्रामुख्याने पाऊस सर्वदूर होत असून मध्य महाराष्ट्रातील घाटमथ्यावरील भागात पाऊस आहे़.  मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे़ कोकण, गोव्यात सरासरीच्या २० टक्के पाऊस अधिक झाला आहे़.  मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असली तरी अहमदनगर (८ टक्के), पुणे (७५ टक्के), सातारा (२१टक्के), कोल्हापूर (२६ टक्के) या जिल्ह्यात जादा पावसाची नोंद झाली आहे़.  सोलापूरला तब्बल (-५० टक्के), सांगली (-१५ टक्के) कमी पाऊस झाला आहे़. उत्तर महाराष्ट्रातील केवळ नाशिक जिल्ह्यात २१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून नंदुरबार (- ३६ टक्के), जळगाव (-१७ टक्के), धुळे (-१६ टक्के) या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे़. मराठवाड्यात १ जून ते १४ जुलै अखेर सरासरीपेक्षा तब्बल ३१ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे़.  हिंगोली (- ४६ टक्के) व नांदेड (- ४५ टक्के) या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस झाला असून बीड (-३७ टक्के), परभणी (-३४ टक्के), उस्मानाबाद (-२६ टक्के), लातूर (-३२ टक्के), जालना (-१७ टक्के), औरंगाबाद (-८ टक्के) कमी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण विदर्भात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला़. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते़. मात्र, त्याचा सर्व रोख हा ओडिशा व मध्य प्रदेशाच्या दिशेने राहिल्याने बुलढाणा वगळता विदर्भाला त्याचा जास्त फायदा होऊ शकला नाही़. विदर्भातील यवतमाळ (-५१ टक्के), वर्धा (-४३ टक्के), वाशिम (-४१ टक्के), अमरावती (- ३९ टक्के), भंडारा (- ३१ टक्के), अकोला (- २८ टक्के), चंद्रपूर (-२३ टक्के), गोंदिया (-३७ टक्के), नागपूर (-२६ टक्के), गडचिरोली (- २० टक्के) या जिल्ह्यात पावसाची नितांत गरज आहे़. केवळ बुलढाणा (-३ टक्के) सरासरीच्या जवळपास पाऊस आतापर्यंत झाला आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरात सध्या पावसाच्या दृष्टीने अनुकूल स्थिती नसल्याने मराठवाडा व विदर्भात सध्या मोठ्या पावसाच्या दृष्टीने अनुकुल परिस्थिती नाही़. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील खरीप पेरण्यांवर त्याचा प्रतिकुल परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळVidarbhaविदर्भ