शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
4
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
5
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
6
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
7
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
8
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
9
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
10
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
11
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
12
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
13
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
14
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
15
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
16
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
17
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
18
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
19
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
20
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे

बांगरांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण; शरद पवार-अजित दादा अजूनही एकत्र...; पक्षांतरानंतरही वेबसाईट बदलायला वेळ मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:52 IST

कोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही.

- महेश पवार लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन स्वतंत्र पक्ष अस्तित्वात आले. ही संधी साधत अनेकांनी पक्षांतर केले. मात्र, पक्षांच्या वेबसाइटवर अजूनही त्या नेत्यांचे फोटो दिमाखाने झळकत आहेत. मनसेच्या दोन सरचिटणीसांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन उद्धवसेनेते प्रवेश केला आहे. मात्र, त्यांचीही नावे मनसेच्या अधिकृत वेबसाइटवर असल्यामुळे ते अजूनही पक्षामध्ये आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी पक्षावर टीका करून १० एप्रिल २०२४ रोजी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी सरचिटणीस परशुराम उपरकर यांनीही राजीनामा दिला. शिंदे यांनी ५ मे २०२४ रोजी, तर उपरकर यांनी २० ऑक्टोबर २०२४ रोजी उद्धवसेनेत प्रवेश केला. मात्र, मनसेच्या अधिकृत वेबसाइटवर अजूनही त्यांची नावे सरचिटणीस पदाच्या यादीमध्ये आहेत.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वेबसाइटमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. मुख्य पानावर प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या बाजूला शरद पवार यांचा जीवनप्रवास सांगण्यात आला आहे. बाजूला खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या फोटोशेजारी बंड करून पक्ष आणि चिन्ह आपल्यासोबत नेणारे अजित पवार यांनाही स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वेबसाइटच्या मुख्य पानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावे आणि फोटो आहेत. नेत्यांच्या यादीमध्ये केवळ नरहरी झिरवाळ यांचे नाव असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांना मात्र स्थान मिळालेले नाही.

आमदारांची मंत्री हाेण्याची स्वप्नपूर्तीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वेबसाइटवरील मंत्र्यांच्या यादीमध्ये आमदार संतोष बांगर यांचे नाव लक्ष वेधून घेते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आ. बांगर मंत्री नव्हते. मात्र, मंत्री होण्याची त्यांची इच्छा या वेबसाइटने पूर्ण केली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरा दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही येथे जुन्याच आमदारांची यादी झळकत आहे.

वेबसाइट अपडेटची तसदी नाहीकोणत्याही पक्षाची अधिकृत माहिती मिळविण्यासाठी त्या त्या पक्षाच्या वेबसाइटला अनेक जण भेट देत असतात. मात्र, त्यांच्यासमोर अशी चुकीची माहिती गेल्यामुळे त्याची विश्वासार्हता राहत नाही. निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षांनी विजयाच्या आनंदात तर पराभूत झालेल्या पक्षांनी हरल्याचा दुःखात वेबसाइट अपडेट करण्याची तसदी घेतली नाही असेच दिसून येते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार