शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी समिती स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 23:59 IST

महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासनातर्फे डॉ.सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे :शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह व नवीन शैक्षणिक धोरण यांना अनुसरून उच्च शिक्षणातील नवे प्रवाह सामावून घेण्यासाठी तसेच  महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने येत्या तीन महिन्यांमध्ये अंतरिम अहवाल करावयाचा आहे, असे उच्च शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले.

महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासनातर्फे डॉ.सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून त्यात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रंजन वेळूकर, डॉ.विजय खोले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.टी. साबळे, मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. नरेशचंद्र, उच्च न्यायालयातील वकील हर्षद भडभडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वरिष्ठ कायदा अधिकारी डॉ.परविन सय्यद, शासकीय विधी महाविद्यालयातील डॉ. रचीता एस राथो, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य शितल देवरुखकर शेठ, दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रसाद थोडे, राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ.अभय वाघ हे या समितीचे सदस्य आहेत. तर राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने हे सदस्य सचिव आहेत. या समितीला सर्व प्रकारचे प्रशासकीय सहाय्य करण्याची तसेच समितीसाठी येणार सर्व खर्च करण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर सोपवण्यात आली आहे.कायद्यातील सुधारणांबाबत 4 डिसेंबरपर्यंत सूचना मागवल्या

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक ,संघटना, विद्यार्थी, पालक, समाजातील इतर घटक यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. सदर सूचना या www.unipune.ac.in संकेतस्थळावर अॅ मेंमेट टू द महाराष्ट्र पब्लिक युनिव्हसिटी अॅक्ट या लिंक वर येत्या 4 डिसेंबर पर्यंत स्वीकारल्या जातील.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र