शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 4:23 AM

विद्यार्थ्यांची गुणवता उच्च क्षमतेने विकसित व्हावी, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च, सेंन्ट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे केली.

सिंधुदुर्गनगरी -  विद्यार्थ्यांची गुणवता उच्च क्षमतेने विकसित व्हावी, त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च, सेंन्ट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे केली.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १६ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाच्या समारोपप्रसंगी तावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक, शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष काळु बोरसे -पाटील आदी उपस्थित होते.तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांची एकूणच गुणवत्ता वाढावी यासाठी इंटरनॅशनल बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत परिक्षेत सध्याचे विषय १0 ते १२ आहेत. या विषयांमध्ये वाढ करुन रोजगाराच्या संधी निर्माण होणाºया विषयांचा समावेश करावा किंवा कसे याबाबत विचारविनिमय सुरु आहे. विषय वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण मिळण्याबरोबरच रोजगार युक्त शिक्षण घेता येईल़शाळाबाह्य कामातून मुक्तता करणार - पंकजा मुंडेविद्यार्थ्यांची गुणवत्ता विकसित करण्यावर भर देण्याबरोबरच शिक्षकांना पूर्ण वेळ मिळावा म्हणून शाळाबाह्य कामातून शिक्षकांची मुक्तता करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.शिक्षकांबद्दल चांगले बोला; शिक्षकाची नारायण राणेंना विनंतीनारायण राणे यांनी या महाअधिवेशनात आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत भाषण केले. . वास्तववादी शिक्षणाचे चित्र समोर आणा, असे सांगत असतानाच एका शिक्षकाने शिक्षकांबद्धल चांगले बोला, असे राणेंना सांगितले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेeducationशैक्षणिक