शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह

By admin | Updated: May 29, 2015 01:19 IST

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह राबविला जाणार आहे.

यवतमाळ : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ राज्यात पर्यावरण सप्ताह राबविला जाणार आहे. दरवर्षी ३ ते ९ जून या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या सप्ताहात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी निवडलेल्या गेलेल्या गावांना प्राधान्य दिले जाणार आहे. ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृती केली जाते. शिवाय वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जातो. गोपीनाथ मुंडे यांचे राज्य आणि देशासाठी असलेले योगदान विचारात घेत हा सप्ताह राबविला जाणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड केली जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, समाज मंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा, शासकीय-निमशासकीय कार्यालय आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश नियोजन विभागाने २६ मे रोजी जारी केले आहेत. सामाजिक वनीकरण विभाग पुणेचे मुख्य वनसंरक्षक यांना रोपे पुरवण्याची जबाबदारी दिली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करावे, असे शासन निर्णयात म्हटले आहे. (वार्ताहर)अहवाल द्यावा लागणारपर्यावरण सप्ताहात हाती घेतलेल्या कार्यक्रमांचा अहवाल विभागीय आयुक्तांना २० जूनपर्यंत सादर करावा लागणार आहे. शिवाय या दृष्टीने कार्यक्रमांची रुपरेषाही त्यांनाच ठरवावी लागणार आहे.