शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात पर्यावरण विषय दुय्यम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 22:00 IST

दिल्ली, महाराष्ट्रासह देशभरातील विविध शहरांमध्ये पर्यावरणविषयक अनेक समस्या गंभीर बनलेल्या आहे.

ठळक मुद्दे पुण्यामध्ये नुकतीच पर्यावरण विषय शिक्षकांची बैठक आठवडाभरात केवळ ४५ मिनिटांच्या दोन तासिकाराज्यभरात केवळ ५०० च्या जवळपासच शिक्षक संख्या

पुणे : दिल्ली, महाराष्ट्रासह देशभरातील विविध शहरांमध्ये पर्यावरणविषयक अनेक समस्या गंभीर बनलेल्या आहे. याविषयी केंद्र व राज्य सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात असल्याचा दावा आहे. पण प्रत्यक्षात पर्यावरणाला दुय्यम स्थान मिळताना दिसत आहे. राज्यात इयत्ता अकरावी व बारावीसाठी पर्यावरण हा विषय बंधनकारक असला तरी शिक्षकांच्या कमतरतेमुळे अनेक बंधने येत आहेत. त्यातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या विषयाला गुण न देता केवळ श्रेणी देण्याचा निर्णय घेत महत्व कमी केल्याचा आरोप पर्यावरण शिक्षकांकडून केला जात आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासह विविध विषयांवर जनजागृती करण्याबाबत सरकार नेहमीच आग्रही असते. या पिढीला जागृत केल्याने भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर मात करता येईल, हा उद्देश. पण प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये सरकारकडून पर्यावरणाला दुय्यम स्थान दिले जात आहे. अकरावी व बारावीला असलेल्या पर्यावरण विषयाला मिळणारे ५० गुण रद्द करण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये घेतला. २००६ पासून असलेली श्रेणी पध्दत बंद करून २०१३ मध्ये गुण पध्दत सुरू करण्यात आली. मात्र, पुन्हा सहा वर्षात श्रेणीला प्राधान्य देण्यात आले आहे. हा निर्णय रद्द करून पुन्हा ५० गुण थेट गुणपत्रिकेत यावेत अशी मागणी पर्यावरण शिक्षकांनी केली आहे. याबाबत पुण्यामध्ये नुकतीच पर्यावरण विषय शिक्षकांची बैठक झाली. बैठकीमध्ये या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारीही शिक्षकांनी दर्शविली आहे. प्रस्थापित विषयांनाच प्राधान्य दिले जात आहे. या विषयासाठी आठवडाभरात केवळ ४५ मिनिटांच्या दोन तासिका असतात. राज्यभरात केवळ ५०० च्या जवळपासच शिक्षक संख्या आहे. उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या संख्येच्या तुलनेत हे प्रमाण खुपच कमी आहे. त्यामुळे पर्यावरण शिक्षण विषयाच्या गुणदानासाठी पर्यावरणविषयक तज्ज्ञ समितीद्वारे प्रभावी मुल्यमानप योजना तयार करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. -----------विषयाचे गुण गेल्यामुळे त्याचे महत्व कमी होऊन विद्यार्थी व पालकांच्या मनात दुय्यम स्थान निर्माण झाले आहे. पर्यावरण विषयक मुल्ये प्रभावीपणे विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी हा विषय गुण पध्दतीमध्ये असणे महत्वाचे आहे. पण हा विषय नेहमीच दुय्यमस्थानी राहिला आहे. - अनुराधा पाटील, पर्यावरण शिक्षक, पुणे------------पर्यावरणासाठी पुर्णवेळ शिक्षक नसल्याने इतर शिक्षकांकडे ही जबाबदारी सोपविली जाते. तिथेच त्याचे गांभीर्य कमी होते. गुण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना किमान गुण मिळविण्यासाठी काही प्रकल्प करावे लागत होते. त्याचे गुण पुढे येत होते. पण आता श्रेणी पध्दतीमुळे या प्रकल्पांचे महत्व कमी होऊन गांभीर्य राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना सरसकट ह्यअह्ण श्रेणी देण्याचे प्रकार यापुर्वी घडत होते, आताही घडतील. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा सरकारचा हेतु कधीच साध्य होणार नाही, असे शिक्षकांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाenvironmentपर्यावरणGovernmentसरकार