शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

खान्देशी भरीत पार्टीच्या आस्वादाचा आनंद ठेवा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:51 IST

खान्देशच्या खाद्यसंस्कृतीतील विविधता वैशिष्ट्यपूर्ण आहे. हायवेच्या बाजूच्या रस्त्यावर ओळीनं असलेल्या ढाब्यांच्या समोरच्या बोर्डवर शेवभाजी- दाल फौजदारी - दालगंडोरी, पाटवडी रस्सा... अशी पदार्थांची नावं नजरेस पडायला लागली की, समजायचं खान्देशची हद्द सुरू झाली.

डॉ. अस्मिता गुरव, मुक्त पत्रकार, जळगाव -आपल्याकडे आनंद व्यक्त करण्याच्या अनेक पद्धतींत स्नेहभोजनाला विशेष प्राधान्य दिलं जातं. स्नेहभोजनाला ‘बोलीभाषेत’ पार्टी म्हटलं जातं. पार्टी करणं, पार्टीला जाणं हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. आपल्याकडे प्रत्येक प्रदेशाची खाद्यसंस्कृती ही त्या भागात विपुल प्रमाणात पिकणाऱ्या धान्य-भाज्या यांवर आधारित असते. खान्देशाची खाद्यसंस्कृती ही केळी-कपाशी इतकीच बैंगणी आहे... अर्थात ‘भरीता’चा सन्मान करणारी आहे. इथली वांगी सर्वत्र नावाजली आहेत, प्रसिद्ध आहेत. इथे बाराही महिने भरीत पुरवणारी हॉटेल्स आहेत.

खान्देशात ‘भरीत पार्टी’ हा पूर्वापर चालत आलेला आणि आजही लोकप्रियता अबाधित असलेला प्रकार आहे. भरीत पार्टीसाठी मळे - शेतं ‘बुक’ करण्याचा प्रकार सध्या सर्वत्र प्रचलित आहे. आनंद ‘विकत घेता येतो’ हा व्यावसायिक दृष्टिकोनही अलीकडच्या काळात दिसून येतो. ज्यांच्याकडे शेत-मळा नाही, किंवा शेत-मळा असलेले मित्र नाहीत त्यांनाही पैसे देऊन शेत-मळा बुक करता येतो.  आपल्या आप्तमित्रांसह भरीत पार्टी आयोजित करणं शक्य झालं आहे. खान्देशच्या खाद्यसंस्कृतीतील विविधता वैशिष्ट्यपूर्ण आहे. हायवेच्या बाजूच्या रस्त्यावर ओळीनं असलेल्या ढाब्यांच्या समोरच्या बोर्डवर शेवभाजी- दाल फौजदारी - दालगंडोरी, पाटवडी रस्सा... अशी पदार्थांची नावं नजरेस पडायला लागली की, समजायचं खान्देशची हद्द सुरू झाली.

इथल्या तूरकाठी शेवेचा रस्सा आणि पाटवडीचा मसालेदार तवंग नॉनव्हेजपेक्षाही सरस ठरावा असा आहे. दिल्लीच्या पंजाबी ढाब्यावरची काली दालमाखनी अर्थात उडदाचा (काळ्या सालीचा) खान्देशी दालफौजदारी आविष्कार चवीला भन्नाट लागतो. आंबट-तिखट- मसालेदार दाळगंडोरी लसूण-मिरचीचा झणझणीत ठेचा आणि रवाळ-खरपूस तळलेली बट्टी- त्यावर पातळ वरण आणि वांग्याची घोटलेली भाजी, तोडीलावणं म्हणून लिंबू पिळून केलेल्या मिरच्या हा तर गणपती - नवरात्री - दत्तजयंतीच्या भंडाऱ्याचा मेनू, तसंच हळदीच्या पंगतीचा मेनू...

चिबाळचे फुनके-कढी, चिघूर, कंटुले, शिंदाळेसारख्या मोसमी रानभाज्या, ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी, ज्वारीचे घिंडरे - बिबडे पापड ही खान्देशची रुचकर सफर सर्वदूर पोहोचली आहे. ओल्या गव्हाचे, दराब्याचे लाडू - सांजोरी हा चवीचा ठेवा हवा हवासा वाटणारा. कळण्याची भाकरी - हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा आंबट-गोड-तिखट लाल चटणी, मेथ्यांच्या पिठाच्या दशम्या आणि त्यावरची चटणी, सुकवलेली आंबाड्याची भाजी हा हिवाळी मेनू चविष्ट तर आहेच, पण पौष्टिकही आहे... खान्देशच्या ह्या रुचकर वाटा म्हणजे भूलभुलैयाच म्हणता येईल. खान्देशी कढी-खिचडी, बाजरीची खिचडी, पुरीसारखे टम्म फुगणारे उडदाचे वडे - मिरची भजे, मुगाच्या येळण्या, खापरावरच्या पुरणपोळ्या - रसई, डुबुक वड्याची मसालेदार भाजी-गुळवणी, एक ना अनेक खवय्यांची पंगत, काय वर्णावी रंगत!

... तर भरीत पार्टीची रंगत काही औरच. शेतात,  मळ्यात आप्तेष्ट - मित्र-मैत्रिणींसह आयोजित भरीत पार्टी हा छोटेखानी समारंभच म्हणता येईल. वांग्याचं छायाचित्र असलेली निमंत्रणपत्रिका... त्यावर अगत्याचं बोलवणं असणारा मजकूर त्याला उत्कट प्रतिसाद देणारा सर्व मित्रपरिवार ... किलो-दोन किलो वजनाची पांढरी झाक असणारी पोपटी वांगी तोलणारी झाडं... मळ्यातली वांगी तुरकाठ्यांवर भाजून सोलणं, मिरची-लसूण-कांदापातीसह भल्यामोठ्या पातेल्यात शेंगदाणे-खोबरं, कोथिंबीर सढळ हाताने वापरलेल्या तेलात परतलेलं भरीत... केळीच्या हिरव्यागार तजेलदार पानावर भरीत - पुरी-कळण्याची भाकरी-पुरी, काकडी-सफरचंद-टोमॅटो - डाळिंबाचे दाणे घालून दह्यातली वाटी भरून कोथिंबीर, तोंडी लाल मिरची, आमसुलाची कढी हा भरीत पार्टीचा मेन्यू. शेतातलं -मळ्यातलं  निसर्गरम्य वातावरण आणि सोबतीला जवळचे मित्र, पैपाहुणे म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग. हुरडा पार्टी, भेळ पार्टी, चुलीवरची मिसळ पार्टी या साऱ्यांतही खान्देशची भरीत पार्टी म्हणजे एकदा तरी आवर्जून अनुभवावी अशी आनंद पर्वणी, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

खान्देशी माणसं मनाने निर्मळ, आतिथ्यशील आहेत. भरीत पार्टी पूर्वापर चालत आलेली परंपरा. देशातील मोठमोठ्या शहरांत राहणारी, परदेशी राहणारी खान्देशी माणसं आपल्या घराकडे, मायेच्या माणसांसोबत राहावं, आजी-आईच्या हातचे चवदार खाण्याच्या ओढीनं आणि भरीत पार्टीच्या गोडीनं धावत येतात... शेतातल्या भरीत पार्टीची ओठांवर रेंगाळणारी चव आणि आनंद मनानं साठवत परततात... 

टॅग्स :Farmerशेतकरी