शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा जुगाड, बैलांच्या मानेवरील ओझे केलं हलकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 12:21 IST

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बैलांच्या मानेवरील ओझे कमी करणारी बैलगाडी तयार करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याची अनोखी भेट दिली

युनूस शेखइस्लामपूर : कृषी संस्कृतीतील बैलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत येथील राजारामबापू इन्स्टिट्यूड ऑफ टेक्नालॉजी (आरआयटी) मधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या मानेवरील ओझे कमी करणारी बैलगाडी तयार करून शेतकऱ्यांना बैलपोळ्याची अनोखी भेट दिली आहे.महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विध्यार्थ्यांनी बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलाच्या मानेवरील ओझे कमी करणारी किमया साधली आहे.शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कॅपस्टन प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या संकल्पना वर काम करण्याची संधी मिळते. त्यांनी चालू घडीला अवघड आव्हानाची निवड करत असताना जवळच असलेल्या राजारामबापू साखर कारखान्यासाठी होत असलेल्या ऊस वाहतूकीत बैलगाड्यांना येणाऱ्या समस्यावर संशोधन करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरविले. या संशोधक विद्यार्थ्यांनी 'सारथी' या नावाने आपला हा प्रकल्प पूर्ण केला.महाराष्ट्रात जवळपास सहकारी आणी खाजगी मालकीचे एकूण 200 साखर कारखाने सुरू आहेत, त्यातील बहुतांश  बैलगाडया जवळच्या भागातून ऊस वाहतूक करत असतात. प्रामुख्याने शेतात ऊस भरताना लावण्यात आलेला लाकडी घोडा जमीनीत घुसणे व मोडणे, बैलांवर अतिभार, रस्त्यांवरील गतिरोधक, खड्यांमुळे पाय घसरने, पाय मुरगळणे व कधी कधी पाय मोडणे अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड दयावे लागते. यामुळे बैलाला दुखापत तसेच बैल चालकाचे आर्थिक नुकसान होते. यावर त्यांनी अफलातून संकल्पना तयार करत कामाला सुरवात केली.त्यांनी दोन्ही बैलांच्यामध्ये तिसरे चाक बसवले जे बैलांवरचा भार कमी करते आणि बैलगाडीसाठी पूर्ण संतुलन देते, हा रोलिंग सपोर्ट बैलांच्या उंचीनुसार कमी-जास्त आणि वर खाली करू शकतो. तसेच याचा उपयोग ऊस भरताना खाली व शेतातून वाहतूक करताना वर अडकवू शकतो.त्यातून बैलांवरील ओझे कमी करण्यात यश आले आहे.या प्रकल्पाची चाचणी ऊस भरताना व रस्त्यावरून वाहतूक करताना करण्यात आली आहे. येणाऱ्या गळीत हंगामात या प्रयोगाची प्राथमिक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.पेटेंटसाठी अर्जसंशोधन निधी अंतर्गत लीड कॉलेज स्कीम,शिवाजी विद्यापीठातून या प्रकल्पासाठी १० हजार रुपये निधी मिळाला आहे. या रोलिंग सपोर्ट प्रकल्पाचे पेटेंट मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.डॉ. सुप्रिया सावंत यांनी मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर प्रा. पी. एस. घाडगे व ऑटोमोबाईल विभागाचे प्रमुख डॉ.एस.आर.कुंभार यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ए.बी. काकडे, डॉ. एल. एम. जुगुलकर, प्रा. सुधीर आरळी आणि प्रा. हर्षल पाटील यांनी अभिनंदन केले. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. आर डी. सावंत व नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीStudentविद्यार्थी