शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर कारखान्यांमध्ये नोकरभरतीला मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 23:00 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधांचे नोकरभरतीचे मनसुबे धुळीला ?

ठळक मुद्देनिवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही सत्ताधाऱ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरणार राज्य शासनाने नोकरभरती रोखुन साखर कारखानदारीतील सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा निर्णय

- प्रशांत ननवरे-बारामती : राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चित करण्यात येणार आहे.हा आकृतीबंध निश्चित  होवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकरभरती करू नये,असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांचे नोकरभरतीचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत.        जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या निवडणुकांचे पडघम वाजु लागले आहेत.मात्र,याच दरम्यान राज्य शासनाने नोकरभरती रोखुन साखर कारखानदारीतील सत्ताधाऱ्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तोंडावर आलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काही सत्ताधाऱ्यांना हा निर्णय अडचणीचा ठरणार आहे.

राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा अधिकारी,कर्मचारी यांचा आकृतिबंध कसा असावा, याबाबत साखर आयुक्तांनी साखरसंचालकांच्या   अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. तसेच, समितीने सादरकेलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आकृतिबंध निश्चित करण्याचे कामप्रगतीपथावर आहे.राज्यातील बहुसंख्य साखर कारखाने हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. उसउत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी ची रक्कम वेळेत देणेही अडचणीचे ठरत आहे.काही कारखान्याच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झालेले आहे.या पार्श्वभुमीवर राज्यातील सहकारी साखर कारखान्याचा आकृतिबंध निश्चितहोवून त्यास शासनाची मान्यता मिळेपर्यंत राज्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने कोणत्याही प्रकारची नोकर भरती करू नये. साखर आयुक्तांनी याबाबत हे आदेश साखर कारखान्याच्या निदर्शनास आणावेत,त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी, असे आदेश सहकारविभागाचे सचिव प्रमोद वळंज यांनी दिले आहेत.या निर्णयाबाबत राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी ''लोकमत' शी  बोलताना सांगितले की,  राज्यातील साखर कारखान्यांनीआकृतीबंधाप्रमाणेच नोकरभरती करणे आवश्यक आहे. कामगारांना पगारवाढ दिलीजाते, दरवर्षी ८.३३ टक्के बोनस दिला जातो. ते देण्याबाबत दुमत नाही. पगारवाढ आणि बोनस कामगारांना मिळालाच पाहिजे.तो त्यांचा हक्क आहे.मात्र, अनावश्यक भरती करु नये. शेतकरी आणि कामगार एकाच रथाची दोनचाके आहेत. दोन्ही समाधानी राहणे आवश्यक आहे. सहकारी साखर कारखान्याचामालक असणारा ऊस उत्पादक सभासद बाजुला टाकला जावु नये,याची दक्षता घेण्याचीगरज जाचक यांनी व्यक्त केली.———————————————

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेEmployeeकर्मचारीState Governmentराज्य सरकार