शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी अजून निवडणूक कामात

By admin | Updated: November 8, 2014 04:02 IST

निवडणुकीचा निकाल लागून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही झाला़ तरी पालिकेचे कर्मचारी अद्याप स्वगृही परतलेले नाहीत़

मुंबई : निवडणुकीचा निकाल लागून राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही झाला़ तरी पालिकेचे कर्मचारी अद्याप स्वगृही परतलेले नाहीत़ याचा फटका नागरी सेवांना बसत असल्याने विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या अशा ४ हजार कामगारांना मुक्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे़विधानसभा निवडणुकीच्या कामात पालिकेचे ६ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकारी गुंतले होते़ अभियंता, शिक्षक, टेक्निशियन, अधिकारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने महत्त्वाच्या खात्यांचे कामकाज गेले महिनाभर रखडले होते़ मात्र निवडणूक हे राष्ट्रीय काम असल्याने पालिकेने निमूट आपला कर्मचारीवर्ग वॉर्डावॉर्डातून दिला होता़ मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरवडा उलटला तरी निम्म्याहून अधिक कर्मचारी अद्याप परतलेले नाहीत़ याचा फटका प्रामुख्याने आरोग्य खाते, मालमत्ता कर, पर्जन्य जलवाहिन्या आदी विभागांच्या दैनंदिन कामकाजाला बसला आहे़ त्यामुळे निवडणुकीचे काम आटोपले असल्याने सर्व पालिका कर्मचाऱ्यांना ड्युटीतून मोकळे करण्याची मागणी प्रशासनाने शहर व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे़आणखी महिनाभराची प्रतीक्षानिवडणुकीचा निकाल लागला तरी अद्याप निवडणूक आयोगाचे काम संपलेले नाही़ तरी बऱ्याच कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यात आले असून, काही ठरावीक चमूलाच ठेवण्यात आले आहे़ निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या खर्चाची बेरीज लागल्यानंतरच उर्वरित कर्मचारी सोडण्यात येतील़ यास महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे समजते़ (प्रतिनिधी)