शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

Maharashtra CM:...पण हक्काची माणसं दुरावू नयेत; रोहित पवारांकडून अजितदादांना भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 11:40 IST

रोहित पवार यांनी फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

मुंबई : पवार कुटुंबियांमध्ये कौंटुंबीक कलह असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसमधून स्पष्ट केले असताना अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अजितदादांनी स्वगृही परत येण्याचे आवाहन केले आहे.

रोहित पवार यांनी फेसबूक पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यात ते म्हणतात की, लहानपणापासून शरद पवार साहेबांना पाहत आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडिलांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत. तसेच अजितदादांचे वडील वारल्यानंतर त्यांनादेखील सावरणारे साहेबच होते. त्यांच्या पश्चात शरद पवारांनीच वडिलांचे प्रेम दिले. याचबरोबर साहेब अडचणीत असल्यावर खंबीर भूमिका घेत त्यांच्यासोबत अजितदादा राहत होते. 

आजच्या घडामोडी पाहता ते जुने चित्र तसेच रहावे अशी इच्छा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर अजितदादांनी शरद पवारांचे सर्व निर्णय मान्य करावेत आणि स्वगृही परत यावे असे मनापासून वाटत असल्याचे रोहित म्हणाले. शरद पवार राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत आणि करणारही नाही असे स्पष्टीकरण रोहित यांनी दिले. याचबरोबर सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत. या काळात कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं, असेही रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवार यांनी अजितदादांना भावनिक आवाहन करताना त्य़ांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे सांगताना या सगळ्या राजकारणात हक्काची माणसं दूरावू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019