शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्यिकांचाही एल्गार

By admin | Updated: October 14, 2015 04:24 IST

देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणाव व हिंसक घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या देशभरातील साहित्यविश्वातून निषेधाचे सूर उमटत असतानाच आता मराठी साहित्यविश्वातूनही एल्गार पुकारला गेला आहे

मुंबई : देशातील वाढती असहिष्णुता, जातीय तणाव व हिंसक घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या देशभरातील साहित्यविश्वातून निषेधाचे सूर उमटत असतानाच आता मराठी साहित्यविश्वातूनही एल्गार पुकारला गेला आहे. प्रसिद्ध लेखिका प्रज्ञा दया पवार यांच्यासह हरिश्चंद्र थोरात यांनी देशातील अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ राज्य सरकारचे सर्व पुरस्कार, पुरस्काराच्या रकमेसह परत केले असून, तसे त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविले आहे. अनुवादक गणेश विसपुते आणि संजय भास्कर जोशी हेही पुरस्कार परत करणारांच्या रांगेत उभे आहेत.डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यापाठोपाठ कर्नाटकातील विवेकवादी लेखक कलबुर्गी यांची झालेली हत्या आणि दादरी हत्याकांडाचा निषेध म्हणून आजवर २३ ज्येष्ठ साहित्यिकांनी आपले साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार परत केले आहेत. (प्रतिनिधी)आणीबाणीपेक्षाही सद्य:कालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे. याचे कारण तेव्हा जनसामान्यांवर फक्त शासनाचीच करडी नजर होती. आता मात्र शासनरहित अगदी आपण जिथे राहतो, वावरतो, नोकरी-व्यवसाय करतो तिथपर्यंत आपल्यावर लक्ष ठेवणारे सत्ताधाऱ्यांचे पक्षसेवक दिसतात. शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला-साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात अपरिमित दंडेलशाही सुरू आहे. - प्रज्ञा पवार, लेखिका>>पद्मश्री किताब परत करणारमंगळवारी कर्नाटकचे सुप्रसिद्ध साहित्यिक रहमत तरीकेरी यांनीही आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला. पाठोपाठ पंजाबच्या नामवंत लेखिका दलीप कौर टिवाणा यांनीही आपला पद्मश्री किताब परत करण्याची घोषणा केली.प्रज्ञा पवार यांनी सर्व सरकारी पुरस्कारांसह १ लाख १३ हजार रुपयांची पुरस्कारांची रक्कमही मुख्यमंत्र्यांना धनादेशाद्वारे पाठविली. हरिश्चंद्र थोरात यांनीही उत्कृष्ठ साहित्यनिर्मितीसाठी २००६ आणि २०११ साली मिळालेल्या पुरस्कारांचे ५२ हजार रुपये, मानचिन्हासह परत केले आहेत.