बैलांना आंघोळ घालताना ११ जणांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 06:20 IST2018-09-10T06:20:30+5:302018-09-10T06:20:39+5:30

पोळ्याच्या दिवशी रविवारी बैलाला आंघोळ घालताना झालेल्या दुर्घटनांमध्ये ११ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Eleven people drowned while bathing the bulls | बैलांना आंघोळ घालताना ११ जणांचा बुडून मृत्यू

बैलांना आंघोळ घालताना ११ जणांचा बुडून मृत्यू

औरंगाबाद/नाशिक/अमरावती : पोळ्याच्या दिवशी रविवारी बैलाला आंघोळ घालताना झालेल्या दुर्घटनांमध्ये ११ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मराठवाड्यात वेगवेगळ्या घटनांत आठ मुलांचा जलाशयात बुडून मृत्यू झाला. मृतांत दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. बैलाला आंघोळ घालण्यासाठी जलाशयावर गेलेला मुलगा नाशिकला वाहून गेला.
अमरावती जिल्ह्यात रामपूर येथे पूर्णा नदीत एक जण बुडाला. अकोल्यातही एक जण बुडाला. जळगाव जिल्ह्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून
मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात पोळ्यादरम्यान बैलांनी फरफटत नेल्यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

Web Title: Eleven people drowned while bathing the bulls