मोठी बातमी! नागपूरमधील मेयो रुग्णालयात शॉर्ट सर्किट, व्हेंटिलेटर पडले बंद; कोरोनाचे रुग्ण अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 12:53 PM2021-03-21T12:53:18+5:302021-03-21T12:55:19+5:30

मेयोच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रविवारी ११.२० वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सक्रीट होऊन धूर निघाला. तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने भंडारा उपजिल्हा रुग्णालयासारखी मोठी दुर्घटना टळली.

electric short circuit at Mayo Hospital in Nagpur corona patient facing difficulty as ventilator power cut | मोठी बातमी! नागपूरमधील मेयो रुग्णालयात शॉर्ट सर्किट, व्हेंटिलेटर पडले बंद; कोरोनाचे रुग्ण अडचणीत

मोठी बातमी! नागपूरमधील मेयो रुग्णालयात शॉर्ट सर्किट, व्हेंटिलेटर पडले बंद; कोरोनाचे रुग्ण अडचणीत

Next

मेयोच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रविवारी ११.२० वाजताच्या सुमारास अचानक शॉर्ट सक्रीट होऊन धूर निघाला. तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने भंडारा उपजिल्हा रुग्णालयासारखी मोठी दुर्घटना टळली. परंतु विभागातील व्हेंटिलेटरवर बंद पडल्याने यावर असलेले कोरोनाचे १५वर रुग्ण अडचणीत आले. सुत्रानूसार, या सर्व रुग्णांना तेथून दुसºया वॉर्डात हलविण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी रुग्णलयात गर्दी केली असून आपला रुग्ण कसा आहे, याची विचारणा होत आहे.    

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) सर्जीकल कॉम्प्लेक्स २०१७ मध्ये रुग्णसेवेत सुरू झाले. प्राप्त माहितीनुसार, या कॉम्प्लेक्सचे फायर आॅडिट झाले. त्यात आवश्यक आग नियंत्रण यंत्रणा बसविण्याचा सूचना करण्यात आल्या. यात रुग्णालयाच्या बांधकामानुसार पाण्याची टाकी, वीज नसल्यास पाणीपुरवठ्यासाठी पंप, वेळप्रसंगी बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग, अग्निशामक उपकरण, हायड्रन्ट व्यवस्था, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, पम्प हाऊस व स्प्रिंकलर आदींची सोय करण्यास सांगण्यात आले होते. परंतु याची पूर्तताच झाली नाही. यामुळे अग्निशमनचे ना हरकत प्रमाणपत्रच मिळाले नाही. पूर्वी या कॉम्प्लेक्समध्ये जनरल सर्जरीपासून, नेत्ररोग विभाग, अस्थिरोग विभाग, ईएनटी विभागाचे वॉर्ड व शस्त्रक्रिया गृह होते. परंतु जून २०२० पासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताच या कॉम्प्लेक्सचे रुपांतर कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. ६०० खाटांच्या या कॉम्प्लेक्समध्ये सध्या ४००वर रुग्ण आहेत.

अतिदक्षता विभागात ४०वर रुग्ण असून व्हेंटिलेटरवर १५वर रुग्ण होते. रविवारी सकाळी ११.२० वाजताच्या दरम्यान अतिदक्षता विभागात अचानक मोठा आवाज शॉर्ट सक्रिट झाले. धूर निघताच परिचारिका व डॉक्टरांनी तातडीने विद्युत विभागाला याची माहिती दिली. त्यांनी वीज खंडीत केल्याने पुढील दुर्घटना टळली. परंतु व्हेंटिलेटर बंद पडल्याने यावर कोरोनाचे गंभीर रुग्ण अडचणीत आले. त्यांना दुसºया ठिकाणी स्थानांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. याची वार्ता बाहैेर येताच संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. सध्या रुग्णालयाच्या आत प्रवेशास सर्वांनाच मनाई आहे.

Web Title: electric short circuit at Mayo Hospital in Nagpur corona patient facing difficulty as ventilator power cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.