महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:33 IST2025-11-04T17:18:05+5:302025-11-04T17:33:20+5:30

Maharashtra Local Body Election 2025 Schedule: ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून याठिकाणी मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल असं निवडणूक आयुक्तांनी सांगितले. 

Elections in Maharashtra! Voting for 246 municipal councils, 42 nagar panchayats on 2nd December 2025; Read the district-wise list election | महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मुंबई - राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार असून या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर २०२५ असेल. उमेदवार अर्जाची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत. तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे मागे घेता येतील. मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल असं त्यांनी सांगितले. 

क्रमांकजिल्ह्याचे नाव   नगरपरिषद / नगरपंचायत यादी
1पालघरडहाणू, जव्हार, पालघर, वाडा (न.पं.)
2रायगड

अलिबाग, कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन,

उरण (न.प.)

3रत्नागिरीचिपळूण, देवरुख (न.पं.), गुहागर, खेड, लांजा (न.पं.), राजापूर, रत्नागिरी
4सिंधुदूर्गकणकवली (न.पं.), मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला
5ठाणेअंबरनाथ, कुळगाव-बदलापूर
6अहिल्यानगर 

देवळाली प्रवरा, जामखेड, कोपरगाव, नेवासा (न.पं.), पाथर्डी, राहाता, राहुरी,

संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर

7धुळेदोंडाईचा-वरवाडे, पिंपळनेर, सिंदखेडा (न.पं.), शिरपूर-वरवाडे
8जळगाव

जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल,

फैजपूर, मुक्ताईनगर (न.पं.), नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदूणी (न.पं.), वरणगाव, यावल

9नंदुरबारशहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा
10नाशिक

भगुर, मनमाड, नांदगाव, सटाणा, सिन्नर, येवला, चांदवाड, इगतपुरी, ओझर,

पिंपळगाव बसवंत, त्र्यंबक

11कोल्हापूरआजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव
12पुणेआळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु. (न.पं.), मंचर (न.पं.), राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव-दाभाडे, वडगाव (न.पं.)
13सांगलीआष्टा, आटपाडी (न.पं.), इस्लामपूर, जत, पळूस, शिराळा (न.पं.), तासगाव, विटा
14साताराकराड, महाबळेश्वर, मलकापूर, मेढा (न.पं.), म्हसवड, पाचगणी, फलटण, रहिमतपूर, सातारा, वाई
15सोलापूरअक्कलकोट, अकलूज, अनागर (न.पं.), बार्शी, दुधनी, करमाळा, कुडूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला
16बीडअंबेजोगाई, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, परळी वैजनाथ
17छत्रपती संभाजीनगर फुलब्री (न.पं.), गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, सिल्लोड, वैजापूर
18धाराशिव भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा
19हिंगोलीबसमतनगर, हिंगोली, कळमनुरी
20जालनाअंबड, भोकरदन, परतूर
21लातूरअहमदपूर, औसा, निलंगा, रेनापूर (न.पं.), उदगीर
22नांदेडबिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर (न.पं.), कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा
23परभणीगंगाखेड, जिंतूर, मानवत, पाथरी, पूर्णा, सेलू, सोनपेठ
24अकोलाअकोट, बाळापूर, बार्शी-टाकळी, हिवरखेडा, मूर्तिजापूर, तेल्हारा
25अमरावतीअचलपूर, अंजनगाव सूर्जी, चांदूरबाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, धारणी (न.पं.), मोर्शी, नांदगाव खंडेश्वर (न.पं.), शेंदूरजनाघाट, वरुड
26बुलढाणाबुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदूरा, शेंगाव, सिंदखेडराजा
27वाशीमकारंजा, मालेगाव (न.पं.), मंगरुळपीर, रिसोड, वाशीम
28यवतमाळआर्णी, दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पुसद, उमरखेड, वणी, यवतमाळ, ढाणकी (न.पं.), नेर-नबाबपूर, पांढरकवडा
29भंडारापवनी, साकोली, शेंदूरवाफा, तुमसर, भंडारा
30चंद्रपूरबल्लारपूर, भद्रावती, भिसी (न.पं.), ब्रह्मपूरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, मूल, नागभीड, राजूरा, वरोरा
31गडचिरोलीआरमोरी, देसाईगंज, गडचिरोली
32गोंदियागोंदिया, गोरेगाव (न.पं.), सालेकसा (न.पं.), तिरोडा
33नागपूरबहादुरा (न.पं.), बेसा पिपळा (न.पं.), भिवापूर (न.पं.), बुटिबोरी, डिगडोह, कळमेश्वर-ब्रह्मणी, कामठी, कांद्री कन्हान (न.पं.), काटोल, खापा, कोंढाळी (न.पं.), महादुला (न.पं.), मोहपा, मौदा (न.पं.), नरखेड, निलडोह (न.पं.), पारशिवणी (न.पं.), रामटेक, सावनेर, उमरेड, वानाडोंगरी, बिडगाव-तरोडी (खू), पांढुर्णा (न.पं.), गोधणी रेल्वे (न.पं.), कन्हान-पिपरी, मोवाड, वाडी, येरखेडा (न.पं.)
34वर्धाआर्वी, देवळी, हिंगणघाट, पुलगाव, सिंदी रेल्वे, वर्धा

Web Title : महाराष्ट्र चुनाव: 246 नगर परिषद, 42 नगर पंचायतों के लिए मतदान घोषित

Web Summary : महाराष्ट्र में 246 नगर परिषद और 42 नगर पंचायतों के 288 सदस्य पदों के लिए 2 दिसंबर, 2025 को चुनाव होंगे। नतीजे 3 दिसंबर को घोषित किए जाएंगे। आदर्श आचार संहिता लागू। नामांकन 10 नवंबर से शुरू।

Web Title : Maharashtra Elections: Voting for 246 Nagar Parishads, 42 Nagar Panchayats Announced

Web Summary : Maharashtra's 246 Nagar Parishads and 42 Nagar Panchayats will hold elections on December 2, 2025, for 288 member positions. The results will be declared on December 3. The Model Code of Conduct is now in effect. Nomination starts November 10, 2025.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.