शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांची निवडणूक केवळ बोटावरच्या शाईपुरतीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 04:19 IST

नवमतदारांचे मत : शिक्षणाचा बाजार, शेतकरी आत्महत्या, रोजगाराचा प्रश्न आ वासून उभे

मुंबई : निवडणुकीत सामान्य मतदारांच्या हातात काहीच येत नाही. फक्त बोटावर शाई दिसते... ही प्रतिक्रिया आहे एका नवमतदार विद्यार्थ्यांची. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना ‘लोकमत’ने विद्यार्थी, नवमतदार यांच्या मनातील मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यात एका विद्यार्थ्यांने अशी मार्मिक टिपण्णी केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वसामान्य भेडसावणारे प्रश्न, रोजगाराची समस्या यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. अवांतर विषयांचीच चर्चा जास्त होत आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या वर्तुळात आहे. राजकीय नेते आणि विधानसभेच्या उमेदवारांकडून तीच-तीच आश्वासने, घोषणा सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. निवडणूक महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्रातील विषय प्रचारामध्ये मांडले जाणे अपेक्षित आहे, असे मत नवमतदार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, शिक्षणाचे खासगीकरण, रोजगाराचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या असे अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे आ वासून उभे आहेत, परंतु कोणताही राजकीय नेता यावर भाष्य करत नाही. वादग्रस्त वक्तव्य, शेरेबाजी, टोलवाटोलवी, आरोप-प्रत्यारोप करून निवडणुका जिंकल्या जातात.ज्या सरकारकडून काहीतरी नवीन बदल घडेल, अशी अपेक्षा होती. त्यांनीदेखील पूर्वीच्या सरकारच्या पावलांवर पाऊल ठेवले. ज्या सरकारने सांगितले की, भ्रष्टाचारी राजकर्त्यांना जेलमध्ये टाकू, पण त्यांनी अशा उमेदवारांना त्यांच्याच पक्षात घेऊन उमेदवारी दिली. यंदाच्या निवडणुकीत मत कोणाला करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यघटनेने सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा अधिकार दिला आहे. शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थ्यांची, पालकांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर कोणताही नेता बोलत नाही. काहींना ईडीची भीती वाटत असेल, त्यामुळे मूग गिळून गप्प बसले असतील, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारा परेश जाधव याने दिली.

काही नेते पक्ष सोडून जिथे सत्ता आहे तिथे गेले. अशा नेत्यांची स्वार्थीवृत्ती यातूनच दिसून येते. असे उमेदवार निवडून आले, तर त्यांच्याकडून कोणत्या प्रकाराची लोकसेवेची कामे होतील, यात शंका आहे. प्रचारातील मुद्दे, घोषणा ऐकून कीव येत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारी श्रेया पांचाळ हिने दिली.फक्त ‘मन की बात’ म्हणत मतदारांची दिशाभूलसध्या महाराष्ट्रात ज्या प्रचारसभा चालू आहेत, त्यामध्ये ३७०, राफेल, राममंदिर यासारख्या भावनिक मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात आपले राजकीय नेते बोलताना दिसतात. विधानसभा निवडणूक ही राज्यातील स्थानिक प्रश्नांवर लढवायची असते. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी, शिक्षणाचे खासगीकरण यावर कोणीही बोलत नाही. राज्याच्या हिताची एकही गोष्ट राजकीय नेते करत नाहीत. फक्त मन की बात म्हणत मतदारांची दिशाभूल केली जाते, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठातील मराठी विभागात शिकणारा तुषार मांडवकर याने दिली.

टॅग्स :MumbaiमुंबईAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019