शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणूक?; भाजपा करतंय सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 10:08 IST

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला मिळाले अधिक बळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार, अशी चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आणि आणखी काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपप्रणीत महायुतीने समोर ठेवले आहे. अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे बडे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले तर अर्थातच मोठा फायदा होईल. चव्हाण यांच्यासोबत येत्या दोन-चार दिवसांमध्ये काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जातील असे म्हटले जात आहे. त्या परिस्थितीत या आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. 

आणखी किती आमदार ?चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे देऊन काँग्रेसबाहेर पडतील. ही संख्या १४ पर्यंत असू शकते असे म्हटले जाते. त्यांनी आमदारकी सोडली तर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे पद नसेल, निधी मिळणार नाही. असे असूनही काही आमदारांनी लगेच काँग्रेस सोडली तर लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रच होण्याची शक्यता वाढेल.

सर्वेक्षण सुरू सूत्रांनी सांगितले, की लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्यास काय आणि वेगळी घेतल्यास काय चित्र असेल या बाबतची सर्वेक्षणे खासगी कंपन्यांकडून केली जात आहेत. याची चाचपणी भाजपश्रेष्ठींकडून केली जात आहे.   

...तर खर्च वाढणार महाविकास आघाडी सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर खर्चाचा आकडा वाढेल. दोन्हींचा खर्च करणे महायुतीच्या तुलनेने महाविकास आघाडीला कठीण जाईल. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही करून घ्यायचा, असा विचार भाजपमध्ये सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेची गणिते वेगवेगळी आहेत. लोकसभेसाठी जेवढी पसंती भाजप, मोदी यांना आहे तेवढी विधानसभा निवडणुकीसाठी नसेल असे म्हटले जाते. त्यामुळेच चाळीसपेक्षा अधिक जागा या लोकप्रियतेच्या आधारे निवडून आणाव्यात आणि सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे घ्यावी, असाही एक सूर दिल्लीतील भाजपच्या वर्तुळात आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक