शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एमएमआरडीएचे इलेक्शन बजेट, अर्थसंकल्पात १८ हजार काेटींची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 06:28 IST

...तर प्रकल्पांचे खर्च भागविण्यासाठी यंदा तब्बल २७ हजार ८६५ कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक वर्षात प्रकल्पांना गती दिली जाणार असल्याचे चित्र अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४-२५ या वर्षाचा तब्बल ४६,९२१ कोटींचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल १८ हजार ८१७ कोटींची वाढ करण्यात आली आहे. तर प्रकल्पांचे खर्च भागविण्यासाठी यंदा तब्बल २७ हजार ८६५ कोटी रुपयांचे कर्ज उभारले जाणार आहे. त्यामुळे निवडणूक वर्षात प्रकल्पांना गती दिली जाणार असल्याचे चित्र अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. 

एमएमआरडीएकडून मुंबई महानगरातील वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये भुयारी मार्ग, रस्ते, मेट्रो, सागरी सेतू अशा विविध प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यातील यंदाच्या वर्षात बोरीवली ठाणे भुयारी मार्ग, ऑरेंज गेट ते गिरगाव भुयारी मार्ग, मेट्रो १२ मार्गिका या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होत आहे. सेवा सुविधा उभारण्यासाठी प्रकल्पांवर ४१ हजार ९५५ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे, तर ३९ हजार ४५३ कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. तब्बल ७ हजार ४६८ कोटींची तूट प्रस्तावित आहे. 

या प्रकल्पांसाठी तरतूद - मेट्रो मार्गिका आणि मेट्रो भवन : १७ हजार कोटी- शिवडी ते वरळी उन्नत मार्ग : ६०० कोटी- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक : ६०० कोटी- ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग : ४ हजार कोटी- ऑरेंज गेट, पूर्व मुक्त मार्ग ते मरिन ड्राईव्ह भुयारी मार्ग : २,४०० कोटी- सूर्या प्रकल्प, कवडास उन्नैयी बंधारा, सूर्या नदीवर पाच कोल्हापूर पद्धतीचे बांधकाम, काळू प्रकल्प, देहरजी प्रकल्प : ८८६ कोटी- ठाणे कोस्टल रोड : ५०० कोटी- छेडानगर ते ठाण्यापर्यंत पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण : ५०० कोटी- मुंबई, ठाणे व नवी मुंबईमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचे प्रकल्प : २,३२२ कोटी

मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या सेवा सुविधा उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. यावर्षी सर्वाधिक रकमेची तरतूद ही पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केली आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहे.- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएBudgetअर्थसंकल्प 2024