भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 13:21 IST2025-09-21T13:21:12+5:302025-09-21T13:21:53+5:30
Eknath Shinde News: भारत-पाकिस्तान संघामध्ये आज आशिया कपमधील सामना होणार आहे. पहिल्या सामन्यावेळी भारताने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला होता.

भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे पोस्ट करण्यात आले. तसेच लाईव्हही करण्यात आले होते. यामुळे प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सायबर सेलने लगेचच त्यांचे अकाऊंट रिकव्हर केले आहे.
भारत-पाकिस्तान संघामध्ये आज आशिया कपमधील सामना होणार आहे. पहिल्या सामन्यावेळी भारताने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. आज दुसरा सामना होत आहे. शिवसेना आणि भारत-पाकिस्तान सामना यांच्यात मोठा वाद आहे. नेमके याच दिवशी एकनाथ शिंदे यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे यांचे पूर्वीचे ट्विटर आताचे एक्सवरील अकाऊंट हॅक झाल्याचे समजताच अधिकाऱ्यांनी लगेचच सायबर पोलिसांना माहिती दिली. शिंदेंचे अकाऊट सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ते पुन्हा रिकव्हर करण्यात आले आहे.