शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:06 IST

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे

मुंबई - बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. शिवसेना-राष्ट्रवादी यांना देण्यात येणाऱ्या खात्यांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. फडणवीस आणि अजितदादा सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. येत्या १४ डिसेंबरला कॅबिनेटचा विस्तार केला जाऊ शकतो. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहखाते आणि महसूल खाते देण्यास भाजपा तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

सूत्रांनुसार, १४ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात शिवसेनेला पुन्हा एकदा नगरविकास मंत्रालय मिळू शकते. महसूल आणि गृह खाते मिळण्याची शक्यता नाही. भाजपाला मुख्यमंत्रि‍पदासह २१ किंवा २२ मंत्रि‍पदे स्वत:कडे ठेवू शकते. त्यात ४-५ मंत्रि‍पदे रिक्त ठेवली जाऊ शकतात. मंत्रिमंडळ खातेवाटपावरून चर्चेला उशीर होत आहे कारण त्यात महायुतीचे तिन्ही प्रमुख घटक पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये कमाल ४३ मंत्री होऊ शकतात असं PTI नं वृत्त दिलं आहे. 

तर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप होऊ शकते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. १६ डिसेंबरपासून नागपूर इथं अधिवेशन होणार आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्याठिकाणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते राज्यात परतणार आहे. त्यानंतर याठिकाणी महायुतीच्या नेत्यांची बैठक होऊन मंत्रि‍पदे आणि खातेवाटपाबाबत चर्चा होणार आहे अशी माहिती शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली. 

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागा मिळवून मजबूत बहुमतासह सरकार स्थापन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्व इच्छुकांचे डोळे लागले आहेत. मंत्रिमंडळात भाजपा २०-२१, शिवसेना ११-१२ आणि राष्ट्रवादीला ९-१० मंत्रि‍पदे मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात मागील सरकारमधील काही विद्यमान मंत्र्‍यांना डच्चू मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवार