शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:59 IST

उमरगा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किरण गायकवाड यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती.

मुंबई - नगरपरिषद आणि नगरपालिकांचे निकाल हाती आले आहेत. त्यात सर्वाधिक जागा मिळवून भाजपा नंबर वनचा पक्ष ठरला आहे. मात्र या निवडणुकीत अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि युती पाहायला मिळाल्या. बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी तिन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे होते. या निवडणुकीत राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या उमरगा नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेना आणि काँग्रेस आघाडीला ऐतिहासिक यश मिळालं आहे. याठिकाणी नगराध्यक्षपदासह तब्बल १८ जागांवर विजय मिळवत आघाडीने आपले वर्चस्व निर्माण केले तर सातारा येथील कराड नगरपालिकेतही शिंदेसेनेने  भाजपाला दणका दिला. 

उमरगा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार किरण गायकवाड यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत ३९७६ मतांचे लीड गायकवाड यांनी घेतले. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत वाढतच गेली. अखेर त्यांनी ११ हजार ६६० मते मिळवून भाजपाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य यांचा ६ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे गायकवाड यांना मिळालेली ही मते भाजपा, उद्धवसेना आणि वंचित या तिन्ही उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षाही जास्त होती. या निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा फटका बसला. त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल रजाक अत्तार यांच्यासह सर्व २५ उमेदवार पराभूत झाले.

कराड येथेही शिंदेसेनेचे नगराध्यक्ष विजयी

सातारा जिल्ह्यातील कराड येथे नगराध्यक्षपदी शिंदेसेनेचे राजेंद्रसिंह यादव निवडून आले आहेत. त्यांना २४ हजार ९६ मते पडली. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शिंदेसेना आणि इतर स्थानिक पक्ष मिळून लोकशाही यशवंत आघाडी बनवली होती तर काँग्रेस आणि भाजपा स्वबळावर लढत होते. कराड उत्तर आणि कराड दक्षिण दोन्ही मतदारसंघात भाजपाचे आमदार आहे. त्यात कराड नगरपालिकेत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या यशवंत आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव विजयी झाले आहेत. लोकशाही आघाडीचे १२, यशवंत विकास आघाडी ६, भाजपा ११ आणि अपक्ष १ उमेदवार विजयी झाले आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde's Sena alliance defeats BJP in two municipal council elections.

Web Summary : Shinde's Sena, allied with Congress-Sharad Pawar, snatched victories from BJP in Umarga and Karad municipal council elections. In Umarga, Shinde Sena won the mayoral post with 18 seats. In Karad, Shinde Sena's candidate won against BJP despite BJP's local presence.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस