शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

खातं दिलं पण स्वत:चा स्वार्थ साधला नाही; शिंदे गटाचं आदित्य ठाकरेंना रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 18:52 IST

अजित पवार पडलेल्या उमेदवाराला निधी देत होते. मतदारसंघ बांधण्यासाठी निधी द्यावा लागतो असं आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं.

गुवाहाटी - खाती दिली, सत्ता दिली त्यातून आम्ही स्वत:चा सार्थ साधला नाही. आमदारांना निधी वाटप नगरविकास खात्यातून दिला गेला. वैयक्तिक अडचणी आल्या तेव्हा कोण उभं राहिलं? पडत्या काळात आम्हाला एकनाथ शिंदे यांनी साथ दिली. इतक्या लोकांनी विश्वास टाकला म्हणून एकनाथ शिंदेसोबत आहे. आम्ही शिवसेना सोडली नाही. सोडायची नाही, आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. कुणालाही यापुढे अडचणी येणार नाही त्या अडचणीला आपण सगळे एकत्र असणार आहोत अशा शब्दात शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी उत्तर दिले आहे. 

भरत गोगावले यांनी व्हिडिओतून म्हटलं की, नाण्याची एक बाजू तुम्ही पाहताय. उरले सुरले जे काही बोलतायेत त्यांनी वस्तूस्थिती समजून घ्यावी. अत्यंत तळागाळातून आम्ही काम केले आहे. आमच्या जोडीचे काही आमदार मागच्या वेळी पडले. आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधी तरी पराभव झालेल्या उमेदवारांशी बोलले, मार्गदर्शन केले का? कुणीही विचारत नाही. १ रुपयाचा निधी दिला जात नाही. आमदारकी सोडा, पण नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती यासाठी ताकद देणे गरजेचे होते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

तसेच अजित पवार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षापासून सरपंचापर्यंत निधी देत होते. आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करून त्यांची सुखदुखं जाणून घ्यायला हवी होती. जेणेकरून भविष्यात आघाडी टिकली नाही टिकली तर उमेदवार उभा करायचा झाला तर कोण तयार आहे याचा आढावा घेता आला असता. मुख्यमंत्री असताना १ रुपया निधी देऊ शकलो नाही. अजित पवार पडलेल्या उमेदवाराला निधी देत होते. मतदारसंघ बांधण्यासाठी निधी द्यावा लागतो. मग निधी नसताना उमेदवार कुठल्या जोरावर उभा राहील. ही ताकद आम्हाला एकनाथ शिंदे यांनी दिली म्हणूनच आज पक्षाच्या आमदारांसोबत अपक्षांनीही त्यांना साथ दिली असंही भरत गोगावले यांनी सांगितले. 

शिवसेनेचे ८ मंत्री गुवाहाटीला शिंदे गटात सामीलउदय सामंत यांच्या बंडानंतर शिंदे गटात सहभागी होणारे ते आठवे मंत्री आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेत विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे