शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

"या बंडखोर आमदारांच्या बायका त्यांना सोडून जातील, त्यांच्या मुलांना कोणी पोरी देणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 18:33 IST

Maharashtra Political Crisis:"हे आमदार राज्यात परत आल्यावर लोक त्यांना सडके टमाटे, अंडी फेकून हाणतील."

Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील होणाऱ्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज मंत्री उदय सामंतदेखील शिंदे गटात सामील झाले. आता एकनाथ शिंदेंकडे जवळपास 50 आमदारांचे समर्थन आहे. पण, इकडे कट्टर शिवसैनिक बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत. 

हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh bangar) यांनी अतिशय खोचक शब्दात बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. 'बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही, यांची पोरं मुंजे मरतील', असे खळबळजनक वक्तव्य बांगर यांनी केले आहे. तसेच, काही आमदार संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय, काही आमदार ईडीच्या भीतीने गेल्याचेही बांगर यांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या आदेशानंतर संतोष बांगर गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांशी थेट संपर्क साधत आहेत. वसमत शहरात नागरिकांशी संवाद सधताना त्यांनी हे उद्गार काढले.

'शिंदे गटात सामील होण्यासाठी 50 कोटींची ऑफर'एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौफ्यस्फोट औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे आमदार आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. पण, 100 कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असंही ते म्हणाले. माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेज असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

बंडखोरांना केंद्राची सुरक्षाराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याशिवाय, 15 बंडखोर आमदारांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. शनिवारी सकाळीच शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना 37 आमदारांच्या सहीचे पत्र पाठविले होते. यामध्ये आमच्या कुटुंबीयांचे संरक्षण काढून घेतल्याचा आरोप केला होता. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाHingoliहिंगोली