एकनाथ शिंदेंकडे नेमके संख्याबळ किती? सांगितला बहुमताचा आकडा, पुढच्या वाक्यावर सारे हसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 17:10 IST2022-06-30T17:09:51+5:302022-06-30T17:10:22+5:30
जे आमच्यासोबत मविआ सरकारमध्ये असताना घडले, ते मी कोणासोबत करणार नसल्याचे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले.

एकनाथ शिंदेंकडे नेमके संख्याबळ किती? सांगितला बहुमताचा आकडा, पुढच्या वाक्यावर सारे हसले
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, तर एकनाथ शिंदे असणार आहेत. फडणवीसांनी शिंदेंच्या नावाची घोषणा करून एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामुळे शिंदेंना मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखविला, तुम्ही करून दाखवा असे आव्हान देणाऱ्या शिवसेना नेत्यांची तोंडे आता गप्प झाली आहेत. असे असताना एकनाथ शिंदेंकडे नेमके संख्याबळ किती? याचे उत्तर खुद्द शिंदेंनीच सांगितले आहे.
आम्हाला मविआ सरकारमध्ये अनेक अडचणी आल्या. निर्णय घेता येत नव्हते. आम्ही आवाज उठविला तरी देखील काही फरक पडला नाही. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. तुमच्या सारे समोरच आहे. भविष्याची चिंता आणि शिवसेना पक्ष टिकविण्यासाठी आम्ही नैसर्गिक आघाडीत परतलो आहोत, अशा शब्दांत शिंदे यांनी आभार मानले.
याचबरोबर जे आमच्यासोबत सरकारमध्ये असताना घडले, ते मी कोणासोबत करणार नसल्याचे आश्वासनही शिंदे यांनी दिले. फडणवीस संख्याबळानुसार मुख्यमंत्री होऊ शकले असते, परंतू त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. आमच्याकडे आता भाजपाचे १३०, आमचे ५० आणि आणखी किती येतील माहिती नाही, अशा शब्दांत आपले संख्याबळ सांगितले. यावेळी एकच हशा पिकला.
देवेंद्र फडणवीस मविआवर काय बोलले...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं १०५ जागा आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. जवळपास १६१ युती आणि अपक्ष मिळून १७० बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.