मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला?; जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 21:11 IST2021-11-11T21:10:11+5:302021-11-11T21:11:12+5:30

CM Uddhav Thackeray, Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Eknath Shinde handed over the charge of Chief Minister Know the truth behind the viral message | मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला?; जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य

मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार एकनाथ शिंदेंकडे सोपवला?; जाणून घ्या व्हायरल मेसेज मागचं सत्य

मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर शुक्रवारी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखलदेखील करण्यात आलंय. परंतु यानंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. परंतु हे वृत्त निराधार असून एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे.

'मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्यावर  एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस, पोस्टवर विश्वास ठेवू नये,' असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.


काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
गेल्या दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावरील शारिरीक त्रासाबद्दल सांगितलं होतं.

Web Title: Eknath Shinde handed over the charge of Chief Minister Know the truth behind the viral message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.