शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

संजय राऊत सायको माणूस, रश्मी वहिनींनी दिला होता प्रसाद; संजय शिरसाट म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:18 IST

ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवायला नको होतो त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला याचे वाईट वाटते असंही आमदार संजय शिरसाट म्हणाले.

मुंबई - पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवारांच्या चर्चेनंतरच पहाटेचा शपथविधी झाला असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर फडणवीस हे सुसंस्कृत नेते असून त्यांनी असं करायला नको असं सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस खोटे बोलत असल्याचं सांगितले. त्यात पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊतांनाही माहिती होते असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. 

आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं की, पहाटेच्या शपथविधीच्या रणनीतीत राऊतही होते हे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सगळ्यांना माहिती पडले. परंतु परिस्थितीमुळे बोलता आले नाही. संजय राऊत यांना चांगलाच प्रसाद मिळाला आहे. रश्मी वहिनीने हा प्रसाद दिला. आता पश्चातापाची वेळ निघून गेलीय. आता तेही पुढे गेलेत आणि आम्हीही पुढे आलोय. ज्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवायला नको होतो त्यांच्यावर विश्वास ठेवला गेला याचे वाईट वाटते. काय प्रसाद दिला हे मातोश्रीच्या ऑपरेटरपासून सगळ्यांना माहिती आहे. त्यावर आता भाष्य करणे उचित नाही असं त्यांनी सांगितले. 

संजय राऊत हा सायको माणूसएकदा संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे मातोश्रीला बसलो होतो. संजय राऊत सहज बोलले साहेब मी सामनाला जातो. तेव्हा उद्धव ठाकरेंनी म्हटलं अरे तू जाऊन उगाच दुसरं लफड निर्माण करशील त्यापेक्षा तू इथे बसलेला बरा आहे. हे आम्ही ऐकलेले आहे. ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्यावर भाष्य करणे, आपण काहीतरी वेगळे करतोय अशा अर्विभावात ते बोलतात अशी टीकाही शिरसाट यांनी राऊतांवर केली आहे. 

...तेव्हा मुख्यमंत्रिपदाचा ट्विस्ट आलाजेव्हा २०१९ मध्ये सत्तांतराबाबत मातोश्रीवरील बैठक, एकनाथ शिंदे यांना दिलेल्या सूचना हे सर्वकाही सुरू असताना संजय राऊत पडद्यामागून वेगळ्या हालचाली करत होते. शरद पवार आणि संजय राऊतांचे घट्ट नाते आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सगळे हॉटेलमध्ये असताना टीव्हीवर पाहिले शपथविधी सोहळा झाला. त्यानंतर शरद पवार, संजय राऊत हे त्यांच्या दिनक्रमात व्यस्त होते. मात्र त्यानंतर ज्या घडामोडी घडल्यात त्यात एक ट्विस्ट आला. आता जर हे थांबवायचं असेल तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न करता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हावे लागेल हा ट्विस्ट आला. सत्तासंघर्षात गेमचेंजर त्याठिकाणी झाला. उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती तरी त्यांना मुख्यमंत्री व्हावे लागले असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरे